संपूर्ण बाळकराम - 9

  • 7.6k
  • 2.4k

छोट्या जगूचा 'रिपोर्ट' धाकटा जगू कळू लागल्यापासून एका नाटक मंडळीतच होता. एकदा मंडळीच्या मालकाबरोबर एक लग्नसमारंभ पाहून आल्यावर त्याने आपल्या समवयस्क मित्रांना खाली लिहिल्याप्रमाणे 'रिपोर्ट' दिला- खेळ मुद्दाम बांधिलेल्या मांडवात झाला. स्टेज मातीचेच केले होते आणि फारच लहान होते. 'सीन' जंगलाचा होता असे वाटते पण जंगलाच्या 'झालरी' मुळीच नव्हत्या म्हणून त्याच्याबद्दल स्टेजवर झाडांचा पालाच बांधला होता. पडदे स्टेजच्या भोवती न बांधता सगळया थिएटरभोवती गुंडाळले होते. खेळाचे 'पास' फुकट वाटले होते. खुरच्याबिर्च्या काहीच नव्हत्या. सगळयांना जाजमावरच बसावे लागले. 'कुलीन' स्त्रियांसाठी स्टेजच्या आजूबाजूस जागा राखून ठेविली होती पण गर्दी फार झाल्यामुळे त्यांना उभ्याने सगळा खेळ पहावा लागला. वेश्यांसाठी जागा मुळीच ठेवली नव्हती आणि त्या आल्याही नव्हत्या. मॅनेजर लोकच पानविडीतंबाखू घेऊन ऑडिअन्समध्ये फिरत होते.