८. १२ ज्योतिर्लिंग- भाग १ भारतातील १२ ज्योतिर्लिंगे अतिशय प्रसिद्ध आहेत. ह्या वेगवेगळ्या स्थळांना भेट देऊन मनोकामना पूर्ण केली जाते. सुंदर ठिकाणी वसलेली आणि ऐतिहासिक ओळख असलेली ही १२ ज्योतिर्लिंगे आहेत. धर्म शास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची विधीव्रत पूजा केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. आपल्या पैकी बरेच शिव भक्त असतात आणि ज्योतिर्लिंगाला भेट देण्याची इच्छा असते. भारतात शंकराची एकूण १२ महत्त्वाची मंदिरे आहेत. त्यांना १२ (द्वादश) ज्योतिर्लिंगे म्हणतात. धर्मशास्त्राने या ज्योतिर्लिंगांच्या यात्रेचा क्रम सांगितला आहे, तो असा- सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्। उज्जयिन्यां महाकालमोङ्कारममलेश्वरम् ॥१॥ परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशंकरम्। सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥२॥ वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे। हिमालये तु केदारं