8.12 Jyotiling - 1 books and stories free download online pdf in Marathi

८. १२ ज्योतिर्लिंग- भाग १

८. १२ ज्योतिर्लिंग- भाग १

भारतातील १२ ज्योतिर्लिंगे अतिशय प्रसिद्ध आहेत. ह्या वेगवेगळ्या स्थळांना भेट देऊन मनोकामना पूर्ण केली जाते. सुंदर ठिकाणी वसलेली आणि ऐतिहासिक ओळख असलेली ही १२ ज्योतिर्लिंगे आहेत. धर्म शास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची विधीव्रत पूजा केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. आपल्या पैकी बरेच शिव भक्त असतात आणि ज्योतिर्लिंगाला भेट देण्याची इच्छा असते. भारतात शंकराची एकूण १२ महत्त्वाची मंदिरे आहेत. त्यांना १२ (द्वादश) ज्योतिर्लिंगे म्हणतात. धर्मशास्त्राने या ज्योतिर्लिंगांच्या यात्रेचा क्रम सांगितला आहे, तो असा-

सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्। उज्जयिन्यां महाकालमोङ्कारममलेश्वरम् ॥१॥

परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशंकरम्। सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥२॥

वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे। हिमालये तु केदारं घृष्णेशं च शिवालये ॥३॥

एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः। सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ॥४॥

हिंदु धर्मानुसार अस म्‍हणल जात की जी व्‍यक्ति "वरील बारा ज्‍योर्तिलिंगाचे नावानुरुप मंत्र" जर दररोज पहाटे व सायंकाळी जप केला तर सात जन्‍मातील झालेला पाप ज्‍योर्तिलिंगाच्‍या स्‍मरणामुळे / जप केल्‍यामुळे सर्व पापांचा विनाश होतो अस मानल जात. ही ज्योतिर्लिंगे भारतात वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. प्रत्येक मंदिराची ऐतिहासिक

भारतात शंकराची एकूण १२ महत्त्वाची मंदिरे आहेत. त्यांना आपण १२ (द्वादश) ज्योतिर्लिंगे म्हणतो. प्रत्येक मंदिराची आपली अशी विशेष ओळख आहे. धर्मशास्त्राने या ज्योतिर्लिंगांच्या यात्रेचा क्रम सांगितला आहे, तो असा-

१. सोमनाथ (गुजराथ - वेरावळ)

२. मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश - श्रीशैल्य)

३. महांकालेश्वर (मध्यप्रदेश - उज्जैन)

४. ओंकारेश्वर (मध्यप्रदेश - ओंकारेश्वर)

५. वैजनाथ (महाराष्ट्र - परळी)

६. भीमाशंकर (महाराष्ट्र - भीमाशंकर)

७. रामेश्वर (तामिळनाडु - रामेश्वर)

८. नागेश्वर (महाराष्ट्र - औंढा नागनाथ)

९. विश्वेश्वर (उत्तर प्रदेश - वाराणसी)

१०. त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र - त्र्यंबकेश्वर)

११. केदारनाथ (उत्तरांचल - केदारनाथ)

१२. घृष्णेश्वर (महाराष्ट्र - औरंगाबाद)

* प्रत्येक ज्योतिर्लिंगाची थोडी माहिती-

१. सोमनाथ-

सोमनाथ येथील शिव मंदिर एक महत्वपूर्ण मंदिर असून १२ ज्योत्रीलींगा पैकी १ महत्वाचे ज्योतिर्लिंग असून सोमनाथ मंदिर हे एक महत्वपूर्ण हिंदू मंदिर असून ज्याची गणना १२ ज्योतिर्लिंगा मध्ये केली जाते, गुजरात राज्यातील सौराष्ट्र जिल्ह्यातील वेरावळ बंदर या ठिकाणी स्थापित असून या मंदिराचा इतिहास असा सांगतो की, हे मंदिर चंद्र देवाने स्थापन केले आहे. याचा उल्लेख ऋग्वेद मध्ये केला आहे. हे मंदिर प्राचीन असून त्याला ऐतहासिक सूर्य मंदिर आहे. सर्व ज्योतिर्लिंगा मध्ये सोमनाथ येथील मंदिराचे महत्वपूर्ण स्थान आहे. सोमनाथ मंदिर हे भारतातील सर्वात प्रसिद्ध व धार्मिक पर्यटन स्थळ आहे. त्याचा उल्लेख स्कंदपुराण, श्रीमदभागवत गीता, शिव पुराणात आढळतो. वेद, ऋग्वेदातही सोमेश्वर महादेवाचा महिमा वर्णिला आहे. हे मंदिर ऐतिहासिकदृष्ट्याही महत्त्वाचे आहे.. हे मंदिर गर्भगृह, सभामंडप आणि नृत्यमंडप या तीन प्रमुख भागांमध्ये आहे. याच्या शिखरावरील कलशाचे वजन दहा टन आहे. ध्वजाची उंची 27 फूट आहे.

येथील मंदिराच्या प्रांगणात दररोज रात्री साडे सात ते साडे आठ या एका तासासाठी साउंड एंड लाइट शो चालतो. या द्वारे सोमनाथ मंदिराच्या इतिहासाचे वर्णन सचित्र वर्णन पर्यटकांसमोर केले जाते. एका कथेनुसार या ठिकाणीच श्रीकुष्णाने देहत्याग केला होता. यामुळेच या क्षेत्रास अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.
सोमनाथ ज्योतिर्लिंग गुजरात राज्यातील सौराष्ट्र जिल्ह्यातील रावळ बंदरात स्थापन केले. येथे जाण्यासाठी बस, रेल्वे व खासगी वाहनाने जावू शकतो.

२. श्री शैल्य पर्वतावरील मल्लिकार्जुन-

हे ज्योतिर्लिंग हैदराबाद या ठिकाणी आहे. या मंदिराला सुद्धा ऐतिहासिक माहिती आहे. शिवपुरणात उल्हेख केल्याप्रमाणे हे स्थान पवित्र असल्याचे मानले जाते. १८ महाशक्ती स्थानापैकी १, वीरशैव संप्रदायाच्या ५ प्रमुख मठांपैकी १ आहे. आर्य-द्रविड, शैव यांच्यात या पवित्र स्थानी एकता झाली. इ.स. १४०४ मध्ये विजयनगरच्या राजाने या मंदिराच्या मुख्य सभामंडपाची निर्मिती केली. याच ठिकाणी श्रीकृष्ण, देवराय, हरिहर, व ब्रह्मानंद्राय यांनी ३ गोपुरे बांधली. गुंटकल बेसवाडा - या छोट्या लाइनवर नंद्याळ स्टेशन आहे. तेथून 28 मैलांवर असलेल्या आत्माकुमार गांवाला गाडीने जावें लागतें. आत्माकुरहून मल्लिकार्जुन 43 मैल अंतरावर श्रीशैल्यपर्वतावर आहे.


ह्या मंदिराची रचना उत्कृष्ट आहे. कृष्णा नदीच्या दक्षिण किनारी नलामसाइ जंगलात, २८०० फुट उंचीच्या पर्वतावर हे मंदिर आहे. या मंदिराची निर्मिती ८व्या शतकात झाली. मंदिराची तटबंदी २५ फुट उंच आहे. या ठिकाणी मूळ शिवलिंगावर, छोटे छोटे १००० शिवलिंग कोरले आहेत. या खेरीज मल्लिकार्जुन, पार्वती, रावण, नंदी, कैलास पर्वत यांच्या चांदीच्या मूर्ती आहे. प्रत्येक भिंतीवर शिल्पकृती आहे. इथली महाशिवरात्रीची यात्रा व रथऊत्सव विशेष प्रसिद्ध आहे. इथे जाण्यासाठी रेल्वे आणि बस ने जाता येत.

३. श्री महाकालेश्वर

श्री महाकालेश्वर हे पवित्र ठिकाण मध्य प्रदेश राज्यात उज्जैन मध्ये आहे. अनेक प्राचीन धर्मग्रंथात व पुराणात या ज्योतिर्लिंगाचे सबंध आढळतात, देवलोकीच्या शिल्पकार विश्वकर्माने हे मंदिर बांधले. इ.स १२३५ मध्ये दिल्लीच्या बादशाहने या मंदिरावर हल्ला केला. यानंतर मात्र सुमारे ५०० वर्षांनी मराठ्यांनी या मंदिरावर कब्जा मिळवून पुन्हा मंदिराची निर्मिती केली गेली. तलावाकाठी असलेल्या या मंदिराचे स्थान दक्षिणाभिमुख असून शाळीग्रामच्या शिवलिंगावर चांदीचे कवच चढवले आहे. आणि हे दृश्य अतिशय विलोभनीय आहे. इथे महाशिवरात्री, विजयादशमीस मोठा उत्सव, माघ कृष्ण षष्टी पासून चतुर्दशीपर्यंत उत्सव, प्रदोशानतारच्या पूजा याठिकाणी महत्वाच्या मानल्या जातात.पंचामृतपूजा, धान्यापूजा, पुष्प्पुजा, पाहण्यासाठी भाविकांची इच्छा असते. इथे जाण्यासाठी बसेस आहेत.

४. श्री ओंकारेश्वर ममलेश्वर-

श्री ओंकारेश्वर ममलेश्वर नर्मदेच्या दक्षिण किनाऱ्यावर हे मंदिर आहे. हे ठिकाण देखील मध्य प्रदेश मध्ये आहे. आणि ह्याचे खरे नाव अमरेश्वर आहे. ओंकारेश्वर क्षेत्रात खूप पूर्वी आदिवासींची वस्ती होती. त्यांच्यात बळी देण्याची प्रथा होती, त्यामुळे भाविक या ठिकाणी क्वचितच येत असत. दारीयाइ नावाच्या महान पुरुषाने हि प्रथा बंद करण्याचे प्रयत्न केले. या नंतर या ठिकाणी उत्सव होवू लागले. इ स ११९५ मध्ये राजा भारतसिंहाने आदिवासींचा पराभव केला. या नंतर मात्र मराठ्यांच्या कारकिर्दीत या मंदिराची निर्मिती नव्याने झाली. काही कालावधी उलटल्यानंतर अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराच्या मोठ्या प्रमाणावर सुधारणा केल्या. महाशिवरात्री, कार्तिक पौर्णिमेस उत्सव, श्रावण सोमवारी येथे पूजा आणि अभिषेक केला जातो.

५. श्री परळी वैजनाथ-

हे पवित्र ठिकाण महाराष्ट्र राज्यात असून बीड जिल्ह्यात आहेत. परळी वैजनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्टेशनही आहे. परळी क्षेत्र अति प्राचीन मानले जाते. इ स ११८६ चा एक शिलालेख आहे. इ स १७०६ मध्ये अहिल्याबाई होळकरांनी मंदिराचा जिर्णोद्धार केला. त्यासबंधी संस्कृत शिलालेख या मंदिरात आहे. पुढे या मंदिराची धुरा पेशव्यांनी सांभाळिली. ब्रह्मा, वेणू, सरस्वती, नद्यांचे त्रिवेणी संगम या ठिकाणी बघावयास मिळतो.


परळी गावाच्या एका निवांत आशा ठिकाणी छोट्याशा टेकडीवर हे मंदिर वसले असून हेमांडपंथी शैलीतील मंदिर चिरेबंदी, ३ घाट, दगडी दीपमाळ, सभामंडप, ३ गर्भगृह व दोन नंदिसमावेत वसलेले आहे. याच शिखरावर प्राणी व देवदेवतांची शिल्पे, व बाहेरील बाजूस ११ छोटी शिवमंदिरे आहेत. महाशिवरात्री, दसरा, श्रावणात दर सोमवारी शिवपालाखीची मिरवणूक काढली जाते. या ठिकाणी महादेवास बेल व विष्णूस तुळस वाहिली जाते. आणि येथे भाविक मनोभावे शिवाची आराधना करतात.

६. श्री भीमाशंकर

हे महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. पुण्यापासून ११० किलोमीटरवर असलेले हे तीर्थस्थान पश्चिम घाटात वसले आहे. भीमा नदीही याच परिसरात उगम पावते. शंकराने या ठिकाणी त्रिपुरासुराचा वध केला. त्यानंतर आलेल्या घामातून भीमा नदीचा उगम झाल्याची पौराणिक कथा आहे. भीमाशंकर हे पवित्र ठिकाण समुद्र सपाटी पासून ३४५४ फुट उंचीवर असून हेमांडपंथी शैलीतील हे मंदिर ७ व्या शतकात बांधले गेले. इ स १२०० मध्ये विनायक सावरकरांनी या मंदिराचा जिर्णोधार केला. रघुनाथ पेशव्यांच्या काळात या ठिकाणी विहिरींचे काम झाले होते. औरंगजेबाचा पराभव करण्यासाठी या भागातील सावंत बंधूनी घनदाट जंगलाचा फायदा घेवून औरंजेबाचा पराभव केला असल्याची माहिती आहे.


इथे घनदाट जंगल आहे. इथले शेकरू प्रसिद्ध आहे. सह्याद्री पर्वतातील, देवराई जंगलातील दरीत हे मंदिर वसलेले आहे. सुमारे १०० पायऱ्या उतरून या मंदिरात जावे लागते. या मंदिराच्या शैलीची रचना इंडो आर्यन शैलीतील आहे. त्यामुळेच मुख्य शिखरावर छोटे छोटे शिखर जोडलेले आढळतात. येथे असणारा नंदी मंडप प्राचीन काळातील मानतात. या मंदिरात ११ सुंदर कमानी व नव्या रचनांचा मेळ सुंदररीत्या घातला आहे. इथे जाण्यासाठी बस ची सोय आहे.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED