7 - Bhartatya road tips - 2 books and stories free download online pdf in Marathi

७. भारतातल्या रोड ट्रीप्स- भाग २

७. भारतातल्या रोड ट्रीप्स- भाग २

११. मुंबई ते तारकर्ली

महाराष्ट्रातला स्वच्छ नितळ किनारा म्हणजे तारकर्लीचा. हा परिसर फारसा गजबजलेला नाही. त्यामुळे इथे रोड ट्रीप ठरवत असाल तर समुद्राचे सुंदर दर्शन घेण्यासाठी सज्ज व्हा. आणि तारकर्लीच्या निळ्याशार समुद्रात स्कुबा डाइविंग अनुभव नक्की घ्या. आणि समुद्राखालाच्या जगात हरवून जा.

अंतर : मुंबई ते तारकर्ली हे अंतर 535 किलो मीटर आहे. आणि न थांबता प्रवास केला तर अंदाजे 9 तास लागू शकतात.

टीप : मुंबईपासून एनएच 17 ने कासल गाठायच. तेथून तारकर्ली. या मार्गावरील नैसर्गिक सौंदर्य पाहूनच लाँग ड्राइवमुळे येणारा थकवा दूर पळेल.

१२. . चेन्नई ते येलागिरी-

हा प्रवास अतिशय सुखद आहे कारण ह्या प्रवासात तुम्ही निसर्गाच्या सहवासात असता. येलागिरी हे डोंगर आणि टेकडय़ांनी वेढलेलं छोटंसं शहर आहे. इथले रस्ते, डोंगर, घनदाट वनराई म्हणजे बाइकर्स, ट्रेकर्सकरता पर्वणीच आहे. निवांत वेळ काढून इथे हिंडायचं असेल तर नक्की योजना करा.

अंतर: अंदाजे 228 किलोमीटर इतका प्रवास आहे आणि अंदाजे 4 तास लागू शकतात.पण तुम्ही मध्ये थांबलात तर थोडा जास्ती वेळ जाईल हे विसरू नका.

टीप : पावसाळ्यात हा मार्ग सर्वात सुंदर असतो पण त्यादरम्यान येथे दरडी कोसळतात. त्यामुळे सावधानतेने प्रवास करा.

१३. बंगळुरू ते मुन्नार-

मुन्नार हे थंड हवेच ठिकाण म्हणून ओळखल जात. रस्त्याच्या बाजूने चहाचे मळे पाहतांना "वॉव" तोंडातून आल्याशिवाय राहत नाही. हा पर्यटकांसाठीचा उन्हाळ्यातला विसावा असतो. इथल्या चहाच्या बागा, चहा संग्रहालय, टी प्रोसेसिंग, एर्नाकुलम राष्ट्रीय उद्यान हे मुख्य आकर्षण आहे आणि कार किंवा बाईक वर हिंडायची मजा काही औरच येईल.

अंतर : ह्या परवासात सदह्रण 476 किलो मीटर चा प्रवास आहे आणि अंदाजे 10 तास लागू शकतात.

टीप : इथे सेल फोन कवरेज मिळत नाही. त्यामुळे डिसकनेक्टेड राहण्याची तयारी ठेवा आणि मस्त निसर्गात रमा.

१४. दिल्ली ते जयपूर- यमुना एक्सप्रेसवे मार्गे

भारताच्या पर्यटनातील सुवर्ण त्रिकोण म्हणजे दिल्ली-आग्रा-जयपूर. यमुना एक्सप्रेसवे वर प्रवास म्हणजे एक सुखर प्रवास मानला जातो. पण इथे जातांना टायर मधील एअर प्रेशर बघायला विसरू नका कारण रस्ता सुंदर आहे त्यामुळे स्पीड वाढवायला मोह होऊ शकतो. आग्य्राला ताजमहालसाठी, रणथंबोरला व्याघ्रप्रकल्पासाठी आणि जयपूरला तिथल्या राजवाडय़ांसाठी भेट देता येईल. सिटी पॅलेस, जंतर मंतर, हवामहल, अंबर महल, मुबारक महल, जलमहल हे त्यापैकीच एक आहे.

अंतर : हे अंतर 275 किलो मीटर आहे आणि अंदाजे 5 तास प्रवास होऊ शकतो.

टीप : एनएच 11 मार्गे जयपूर गाठण्यापूर्वी राजस्थानी धाब्यांवर थांबणं विसरू नका.

१५. एनएच 212- कर्नाटक

भारतातल्या सर्वात अॅडव्हेंचर्स रस्त्यांपैकी एक एनएच 212. हा मार्ग केरळातील कोजीकोडेला कर्नाटकमधील कोल्लेगलशी जोडतो. या मार्गावरील घनदाट वनराई थक्क करणारीच. शिवाय इथलं जंगल.. अत्यंत थ्रीलिंग अनुभव देणारं आहे. या रस्त्यावरून जाताना तुमच्यासमोर एखादा जंगली हत्ती उभा राहू शकतो आणि तुमच्या ट्रीपची मजा अजूनच वाढवू शकतो.

१६. हैदराबाद ते कन्नूर

कन्नूरमधली आकर्षणं म्हणजे पयमबल्लम बीच, मुजुपिलंगड बीच, थलस्सरी किला, अरालम वाइल्डलाइफ सँक्च्युरी, स्नेक पार्क, सेंट एंजलो फोर्ट इत्यादी. शहरी वातावरण कंटाळलेले हजारो पर्यटक येथे निसर्गाच्या सान्निध्यात विसावा घेण्यासाठी येतात. आणि ही रोड ट्रीप अविस्मरणीय नक्की ठरते.

अंतर : 897 किलो मीटर अंतर आहे आणि अंदाजे 14 तासाचा प्रवास आहे.

टीप : कन्नुरला कुर्गमार्गे जाणो सोयीस्कर. पोचायला थोडा उशीर होतो पण ओबडधोबड रस्त्यांमुळे होणारा त्रास चुकवता येतो.

१७. चेन्नई ते पॉँडिचेरी

फ्रेंच संस्कृती अनुभवायची असेल तर पाँडिचेरीला जायलाच हवं. प्रवास करतांना रस्त्याच्या बाजूला समुद्र हे दृश्य पाहतांना आन्नाडला पारावार उरणार नाही. शिवाय चेन्नईपासून ५-६ किलो मीटर अंतरावर असलेली मिठागरं पाहता येतील. या मार्गावरील नागमोडी वळणं बाइक रायडर्ससाठी नक्कीच आव्हानात्मक ठरतील. इथे बायकिंगच थ्रील वेगळाच असेल. पण थोडी काळजी घेण महत्वाच ठरेल!

अंतर : 60 किलो मीटर इतक अतर आहे पण 3 तास तरी लागतीलच.

१८. दिल्ली ते डेहराडून

दिल्लीतून एनएच 58 पकडायचा आणि छोटी छोटी शहरं, गावं पार करत डेहराडून गाठायचं. जिथे वाटेल तिथे थांबत थांबत निवांत केलें हा प्रवास सुखद ठरतो. ट्रेकिंग, हायकिंग, स्कीइंग करणाऱ्यांना डेहराडून नक्कीच आवडेल.

अंतर : 255 किलो मीटर इतक अंतर साधारण 5 तासात पार होऊ शकत.

टीप : या मार्गावर नेहमी ट्रॅफिक जाम असतंच. डेहराडूनला पोहचण्यासाठी दुसरा मार्ग उपलब्ध नसल्याने वाहतूक कोंडीला सामोरं जाण्याशिवाय पर्याय नाही म्हणून त्यासाठी मनाची तयारी आधीच करून ठेवा.

१९. दार्जिलिंग ते पेलिंग

दार्जिलिंगपासून पेलिंगपर्यंतचा रस्ता म्हणजे निसर्गाच्या भव्यतेचा नजराणा. या मार्गावर एका बाजूला खोल दऱ्या तर दुसऱ्या बाजूला उंचच उंच पर्वत आहेत. मनोरम्य निसर्गाच दर्शन ह्या रोड ट्रीप मध्ये होईल हे अगदी नक्की.

अंतर : 110 किलो मीटर चा रस्ता 3 तासात पार होऊ शकतो पण निसर्ग बघण्यात रमलात तर मात्र अजून थोडा वेळ वाढेल आणि त्याच दुःख सुद्धा होणार नाही.

टीप : या प्रवासाला निघण्यापूर्वी वेदर अपडेटवर नजर टाकायला विसरू नका.

२०. कोलकाता ते पुरी

सिटी ऑफ जॉय, लॅण्ड ऑफ बीचेस अशी बिरूदावली मिळणाऱ्या कोलकातातून पुरी पर्यंतचा प्रवास म्हणजे मस्तच. टूरिस्ट मॅपवर अजूनही एंट्री न मिळालेली कुलियाना, बिसंगासारखी ठिकाणं या मार्गावर शोधू आणि पाहू/अनुभवू शकता. स्वताचे रस्ते स्वतः शोधण्याचा आनंद इथे घेता येईल.

अंतर : 500 किलो मीटर अंतर आहे आणि साधारण 11 तास लागू शकतात पण मध्ये नवीन मार्गाला लागलात तर मात्र वेळ वाढेल पण आनंद द्विगुणीत होईल.

२१. पामबन पूल

पामबनहून रामेश्वरम बेटांना जाणारा हा पूल म्हणजे एकमेव मार्ग. या पुलावरून प्रवास करताना आपल्याला निळ्याशार समुद्रावर तरंगत असल्यासारखंच वाटतं. या मार्गावर बाइकचालवण्याची मजा काही औरच. आणि ह्या प्रवासात तुमच्या जिवलगांबरोबर असाल तर हा प्रवास नक्कीच संस्मरणीय होईल.

२२. मनाली ते लेह हायवे-

(एन.एच. 21) वरून एकदा तरी प्रवास करावाच. बर्फाच्छादित डोंगर पाहतांना जो आंनद मिळेल त्याला शब्द अपुरे पडतील स्वर्ग म्हणजे काय असा बऱ्याच वेळा प्रश्न पडतो आणि ह्या रस्त्यांवरून प्रवास करताना स्वर्गात गेल्याची अनुभूती येते. शब्द अपुरे पडतील इतक सुंदर सृष्टी सौंदर्य इथे पाहता येईल. ओपन जीप किंवा बाईक वर केलेला हा प्रवास कल्पनेपलीकडे सुंदर असेल ह्यात शंका नाही. हा रस्ता ५ महिने म्हणजेच उन्हाळ्यात आणि ऑक्टोबरच्या मध्यापासून उघडा असतो.

लेह ते श्रीनगरचा प्रवास असाच सुंदर आहे.

२३. मुंबई ते पुणे एक्सप्रेसवे-

मुंबई पुण्यात राहणाऱ्या लोकांसाठी लोणावळा मध्ये जाण्यासाठी रोड ट्रीप साठी हा एक उत्तम पर्याय आहे. हिरव्या दऱ्या आणि उंच डोंगर हा प्रवास सुखावह करतात. इथे प्रत्येक स्पॉट ला थांबून एक फोटो काढायचा मोह तुम्हाला नक्कीच आवरता येणार नाही. पाऊसाळ्यात तर हा रस्ता इतका सुंदर दिसतो. हिरव्या दुलई सोबत पांढरे धबधबे डोळ्यांसाठी अक्षरशः ट्रीट ठरते. हा हायवे रोड ट्रीप साठी भारतातल्या उत्कृष्ट रोड मानला जातो.

अंतर- ९३ किलोमीटर च अंतर तुम्ही तुमच्या मर्जीने पार करू शकता. मध्ये फूड जॉईनट्स आहेत जे खाण्यापिण्याची चिंता मिटवतात.

२४. विशाखापट्टणम ते आरकु व्हॅली-

नागमोडी रस्ते, डोंगर दऱ्या ह्या रोड ट्रीप ला एक उत्तम रोड ट्रीप बनवतात. निसर्गाच्या जवळून केलेला प्रवास अस वाटल्याशिवाय राहत नाही. भारताच्या पूर्वेस असलेल्या बंगाल उपसागराच्या आंध्रप्रदेशातील किनारपट्टीलगतच्या अनंतगिरी पर्वतरांगात आपल्या महाबळेश्वरच्या उंचीइतके आरकू हे ठिकाण प्रसिद्ध आहे. त्या रस्त्यावरील महत्त्वाचं आकर्षण म्हणजे दहा लाख वर्षांपूर्वीच्या लवणस्तंभाची गुंफा ‘बोरा केव्हज’.

अंतर- ११६ किलोमीटरचा हा रस्ता आहे. ऑक्टोबर चे मार्च ह्या काळात इथे जाण्यासाठी उत्तम आहे.

२५. शिमला ते मनाली- मंडी मार्गे

शिमला ते मनाली हा प्रवास अत्यंत मनमोहक आहे त्याच कारण म्हणजे रस्त्याच्या कडेने वाहणाऱ्या नद्या. हे दृश्य इतक विलोभनीय असत की सगळे ताण कुठच्या कुठे पळून जातील. मधेच थांबून बर्फासारख्या थंडगार पाण्यात हात घालण्याचा मोह तुम्हाला नक्कीच आवरणार नाही.

अंतर- २५० किलो मीटर च अंतर पार करतांना जास्ती वेळ लागू शकतो. त्याच कारण म्हणजे डोंगरातला रस्ता! पण ह्या प्रवासात कंटाळा मात्र येणार नाही.

ह्या काही रोड ट्रिप्स.. अजूनही बरेच पर्याय तुम्ही शोधू शकता ज्या करून तुम्ही ताजेतवाने व्हाल हे अगदी नक्की पण याचबरोबर तुमची तुमच्याशी नव्याने ओळख देखील होईल हे सुद्धा अगदी नक्की!

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED