बायको, शॉपिंग आणि मी

(15)
  • 10.4k
  • 3
  • 3.3k

उद्धव भयवाळ  औरंगाबाद   बायको, शॉपिंग आणि मी बायकोसोबत [अर्थात स्वत:च्या, गैरसमज नसावा म्हणून हा खुलासा] शॉपिंग करणे म्हणजे किती कठीण काम असते हे तमाम नवरेमंडळींना चांगलेच ठावूक आहे. नवरा म्हणवणाऱ्या जवळपास सर्वच महाभागांनी या शॉपिंगचा "चांगलाच" अनुभव घेतलेला असणार आहे यात मला तिळमात्र शंका नाही. मी तर खात्रीने सांगतो की, पूर्व जन्मीचे काहीतरी पाप केलेल्या पुरुषांच्या नशिबीच हे असले भोग येत असावेत. बायकोसोबत कुठल्याही प्रकारच्या शॉपिंगला जाणे हे महा कर्मकठीण, क्लिष्ट आणि क्लेशदायक काम असते असे माझे स्वानुभवाने ठाम मत बनले आहे. त्यातल्या त्यात एखाद्याला जर बायकोसोबत साड्यांच्या दुकानात खरेदीसाठी जाण्याचा प्रसंग आला तर त्या बिचाऱ्याची कंबक्ती आली म्हणून समजावे. बायकोसोबत शॉपिंगला