लाईफझोन ( भाग -9)

  • 3.1k
  • 1.4k

       निराशेच्या खाईतून बाहेर येत आम्ही स्वतः ला सावरत जगू लागलो ... अभय आमच्यातच आहे असं वाटून घेत !        त्याच्या हळव्या आठवणी ताज्या होताना हृदयात तो नसल्याची सल दाटून येते . ते हसणं बागडण शालेय जीवनापासून कॉलेजचं अर्धजीवन मैत्रीच्या दुनियेत व्याप्त झालं होतं . पक्षी जसे सकाळी घरट्यातून उडून अवकाशात भरारी घेतांना दूर दूर उडून जातात आणि काहीच क्षणात दिसेनासे होतात तेव्हा त्यांच्या मिलनाची समाप्तीही वियोगातच होते .... ते मनुष्यालाही लागू होतं ! हो ...... जगणं खूप सुंदर आहे पण त्या जगण्यातला गोडवा चाखता आला तर , प्रत्येक क्षण सुखाचा असतो , आपण कोणत्या घटनेला कस हाताळतो तेही आपल्याच भावनांवर निर्भय