लाईफझोन ( भाग -9) Komal Mankar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लाईफझोन ( भाग -9)


       निराशेच्या खाईतून बाहेर येत आम्ही स्वतः ला सावरत जगू लागलो ... 

अभय आमच्यातच आहे असं वाटून घेत !

        त्याच्या हळव्या आठवणी ताज्या होताना हृदयात तो नसल्याची सल दाटून येते . 

ते हसणं बागडण शालेय जीवनापासून कॉलेजचं अर्धजीवन मैत्रीच्या दुनियेत व्याप्त झालं होतं . 

पक्षी जसे सकाळी घरट्यातून उडून अवकाशात भरारी घेतांना दूर दूर उडून जातात आणि काहीच क्षणात दिसेनासे होतात तेव्हा त्यांच्या मिलनाची समाप्तीही वियोगातच होते .... ते मनुष्यालाही लागू होतं ! 


हो ...... जगणं खूप सुंदर आहे पण त्या जगण्यातला गोडवा चाखता आला तर , 

प्रत्येक क्षण सुखाचा असतो , 

आपण कोणत्या घटनेला कस हाताळतो तेही आपल्याच भावनांवर निर्भय करत ना शेवटी

एखादी जवळची व्यक्ती निघून गेल्यावर दुःख वेदनेने माजून तांडव करेलच . 


अभयने म्हटल्याप्रमाणे निराशाही वांझोटी असतेच ती सुख आणि समाधान गिळंकृत करून घेते ... 


   **************

     झाडांच्या पानांचा सळसळाट , समुद्रातील लाटाच्या खळखळत्या प्रवाहाचा आवाज ,

वाहणाऱ्या हवेची मंद झुळूक अंगाला स्पर्श करून जाणारा गारवा अश्या त्या सौन्दर्य सृष्टीच्या सानिध्यात प्रद्युमन एकटाच किनाऱ्याच्या विशाल मधोमध एका खडकावर 
बसून , एकाग्र चित्ताने ऑर्गन वाजवीत बसला होता . 

आमच्या येण्याकडेही त्याचे लक्ष नव्हते . देहभान विसरून प्रद्युमन मधुर स्वरात वाजवत 

होता . 

      जणू सगळा त्रास थकवा तो त्या संगीताद्वारे वाहवून घेत होता .किती वेळचा 

बसला असावा तो असा इथे एकटाच येऊन ... आम्ही शांत त्याच्या पाठीमागे उभं राहून

त्याचं मधुर वाजवणं ऐकत बसलो त्याला तिथे आम्ही असल्याची कसलीही भणक 

न लागू देता . अर्धातास आम्ही तसच उभं होतो . शेवटी ......

' हॅपी बिर्थडे टू यू प्रद्युमन ......  हॅपी बिर्थडे टू यू .... ' एका सुरातच आम्ही त्याला 

टाळ्यांच्या गजरात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .

'अरे तुम्ही सर्व इथे .... माझा माझ्याडोळ्यांवर विश्वास बसतं नाहीये , डॅन तू .... तू अमेरिकेवरून कधी परतलास आणि सँडी अगं तू तर कॉन्फरनससाठी गेली होती . आणि 
रेवा तू ..... ओहहह हो खर सांगू तुम्हाला सर्वाना इथे बघून विश्वासच होतं नाहीये ! '
 
डॅन समोर येत त्याच्या पाठीवर हात मारत म्हणाला , ' कसं वाटलं सरप्राईज ?? '

' व्हेरी व्हेरी थँक्स यारो , सकाळ पासून तुमच्या कॉलची वाट बघत होतो म्हटलं तुम्ही 

सर्व आपल्या कामात माझा बर्थडे पण विसरले की काय खूप अस्वस्थ झालो होतो मी .... 

पण खरं सांगू खूप सुखद धक्का होता हा माझ्यासाठी तुमचं सर्वाचं इथे येऊन मला भेटणं . '

' प्रद्युमन .... आम्हाला माहिती होतं आम्ही आलो नाही की तू इथे येऊन ऑर्गन वाजवत 

बसणार आहेस हा आमचा तुला भेटण्याचा प्लॅन होता बरं का ही सँडीची झक्कास आयडिया ....! "

असं मी म्हणतच तो ..... आम्हा सर्वांना आलिंगन द्यायला जवळ आला . 

' मी जगातला फार नशीबाव व्यक्ती आहे , ज्याला तुमच्यासारखी प्रेमळ मित्र मिळालीत . ' 

प्रद्युमनसोबत आम्ही त्या खडकावर विश्रांती करायला बसलो . 

एवढ्यात सँडी प्रद्युमनला म्हणाली , 

' ये प्रद्युमन तुला ऑर्गन खरचं खूप छान वाजवता येतो बघ ना आज आम्हाला किती 

वर्षांनी तुझं मधुर संगीत ऐकता आलं .... तसं निसर्गाच्या सानिध्यात तुला रमायला खूप 

आवडतो हो हो अरे आठवलं .... तू जेव्हा आमचा नवीन मित्र म्हणून आला होतास तेव्हा तू कुणाशी मैत्री न करता निसर्गाच्या सहवासात राहणं पसंद करायचास ना ?? '

एकादमात जुन्या आठवनीना उजाळा देतं सँडी बोलून गेली . 

' हं ....कारण निसर्गाच्या पलीकडे जाऊन माणसाला सुखी करणारी अदभूत शक्तीच नाहीये , पण माणूस त्या शक्तीला अजूनही ओळखू शकलेला नाही .... 
आणि माझंच काय तुम्ही सर्वांनी निसर्गाचा सहवास घ्यायला हवा . '

प्रद्युमनच बोलणं पूर्ण होऊ न देताच मधात डॅन म्हणाला ,

' अरे त्यासाठी आधी निसर्गाशी नातं जोडावं लागतं प्रद्युमन ... जे प्रत्येकाला शक्य नसते 

तू फार होतकरू आहेस जो निसर्गाला भरभरून अनुभवतो .... '