life zone - 1 books and stories free download online pdf in Marathi

लाईफझोन ( भाग -1)

         " रमयंती उठ लवकर मला ऑफिस मध्ये जायला वेळ होईल , तुला माहितेय ना आज महत्वाची मीटिंग आहे . "

             संजीव  तिला आवाज देत उठवायला लागला . रात्री खूप वेळ पीपीटी तयार करण्यात गेला त्यामुळे रमयंतीला झोपायला बराच वेळ झालेला .  डोळ्यावर झोप असूनही रमयंती डोळे चोळतच उठली .   

          " उठते अरे संजीव , बघ काय घाई करतो ना तू  सात वाजायला आले जेमतेम . "
घड्याळाकडे बघत ती पुटपुटली . उठताच तिने लॅपी उघडला आणि ई-मेल ऑन केलं 
इनबॉक्स मध्ये मॅसेजची गर्दी झालेली . त्यात तिची नजर एका मेलवर पडली तो मेल 
तिच्या जवळच्या पर्सनने केलेला होता म्हणून ती कटाक्षाने तो मेल ओपन करून लोड व्हायची वाट बघत होती .

    त्या दोन ओळी आता तिच्या नजरेसमोर आल्या .

" रामू ,  आय ऐट स्लीपिंग टॅब्लेटस . आय डू नॉट लिव्ह . आय एम गोईंग टू लिव्ह द वर्ल्ड ... " 

     क्षणभरासाठी रमयंतीच्या डोळ्यासमोर घर फिरल्यासारखं वाटतं होतं .  तो मेल वाचून तीच हृदय रेवाला वाचवण्यासाठी धडधडत होतं . चर्र घाम फुटलेला होता . 

      किचन मधून कॉफी घेऊन येत संजीव रमयंतीकडे बघत बुचकाड्यातच पडला . 
" अगं रामू काय झालंय ?? एसी ऑन आहे म्हटलं रूममध्ये आणि तुझ्या चेऱ्यावर एवढा घाम फुटतो आहे .  " 

    काय करावं तिला सुचत नव्हतं तिने फोन नंबर डायल केला . पण फोन बंद येत होता .
  ती तडक उठली बॅग घेतली आणि रूमच्या बाहेर पडतच संजीवला म्हणाली , 

" मी मुंबईला जाते आहे रेवा वॉज व्हेरी सिरीयस , ती ह्या जगात आहे की नाहीहहह ."

घाईतच ती एअरपोर्टवर गेली . मुंबईला जाणारी फ्लाईट पकडली . 

रात्री बाराला आला मेल . रेवाचा फोनही काही केल्या लागतं नाहीये . रेवाने असं का केलं असावं ?? 

     दुबई ते मुंबई ओहहह गॉड रेवा .... प्लिज सेव्ह हर  ..... 

ती कुठेच जाणार नाही हे जग सोडून मला माहित्ये ती आहे .

  डोळे मिटून घेत सीटवर मागे डोकं टेकवत रमयंतीने मोकळा श्वास घेत आपल्या

नजरेसमोर तो मेल आणला .

  रेवा सारखी खोडकर दुसऱ्याला हसवून हसवून वैतागून सोडणारी मुलगी  असा कठोर निर्णयच कसा घेऊ शकते ?? 

    मी झोपेच्या गोळ्या खाल्या . मला नाही जगायचं , मी हे जग सोडून जात आहे . 

काय हे सर्व , ही माझी मस्करी तर नाही ना करत असावी . छे ! अशी मस्करी नाही करू शकत ती .   

कोणी स्वतःच्या मरणाची अशी मजाक कशी करेल ?? 

रेवाने मलाच मेल करून का कळवलं असेल हे . मी तिच्या खूप दूर राहते म्हणून की 

खूप जवळची मैत्रीण आहे म्हणून . कामाच्या व्यापात किती दिवस झाले ना ! जवळ जवळ पाच सहा महिने लोटलेत बोलणं झालं नाही आणि रेवा तिनेही आपल्याला कॉल  करून 
विचारलं नाही ह्याच काळात काही घडलं असावं . तेव्हाच तिने असा टोकाचा निर्णय घेतला . 

मी अनुरागला कॉल करून विचारते . नाही नको उगाच त्याला विचारलं तर तो म्हणेल 

तुला सांगून तिने मला फसवायचा कट रचला आणि आत्महत्या केली . पण , ती कुठे आहे

कसं माहिती करायचं जावं तर मला त्याच्याच घरी लागणार आहे .  त्याला कॉल करेल तेव्हाच मी त्याचा घरी पोहचूशकेल ती त्याच्या घरी असावी की काकूंकडे   त्यांना रेवा बद्दल माहिती नसणार तर उगाच टेंशन घेतील . 

अनुरागलाच कॉल करायला पाहिजे . 

रमयंतीने अनुरागला कॉल केला रिंगा जात होत्या पण अनुराग कॉल उचलत नव्हता .

ती आणखी खजील होतं विचारात गुंतली एवढ्यात फोन वाजला . 

रमयंतीने रिसिव्हर कानाला लावला . पलीकडून आवाज आला  .

" हॅलो , रमयंती ना ! " 

अनुरागच्या स्वरात पहिल्यांदाच भेदरट  कापरेपणा जाणवत होता आवाज कुठे तरी अडखळल्यागत होत होता . 

त्याच्या आवाजावरून रमयंतीला परिस्थितीची पूर्वकल्पना आली .  

" हो , रेवा कुठे आहे ? "

     अनुरागला कल्पना नव्हती रेवाने तिला मेल करून कळवलं असल्याची  . 

रेवाने काय केलंय हे रमयंतीला माहिती नसावं अस 

त्याला वाटलं रेवा कुठे आहे असं विचारताच तो म्हणाला , 

" रेवाने झोपेच्या गोळ्या खाल्या . हे मला मध्यरात्री कळलं म्हणून बर झालं मी तात्काळ तिला हॉस्पिटलमध्ये आणले . अजून ती होश मध्ये आलेली नाही . डॉक्टर म्हणाले बारा तासात ती होशवर नाही आली तर आम्ही वाचवू शकणार नाही तिला .  "

   हुंदका गिळतच तो बोलू लागला . 

" तू ये रमयंती, रेवाला तुझी खूप गरज आहे अजूनही तिच्यात जीव आहे , ती मला सोडून ह्या जगातून नाही जाऊ शकत ग . " 

  रमयंती ज्या भ्रमात होती तो भ्रम तिच्यातून नाहीसा होत होता . तिला वाटतं होते अनुरागच्या रागात तिने हे पाऊल उचलले असावे पण त्याच्या बोलण्यावरून जाणवत होतं की तो रेवाला खूप जपतो .  

त्याच्या बोलण्याने रमयंती निःशब्द झाली . 

अनुराग एखाद्या लहान लेकरसारखा रडत होता बोलताना . त्याला समजवत रमयंती म्हणाली , 

" हो , हे बघ तू रडू नको सावर स्वतःला . मी येत आहे रेवा आपल्याला सोडून कुठेच जाणार नाही . " 

रिसिव्हर ठेवतच  तिने . अश्रूंना मोकळी वाट करून दिली . 

               रमयंती एक वर्ष पेंगेस्ट म्हणून रेवाच्या घरी राहिलेली तेव्हापासून त्या दोघी एकमेकींना ओळखत होत्या .  

  रेवा  रमयंतीला आपली मोठी बहीण मानत होती आणि एक खूप जवळची मैत्रीण . 

     रेवाचा स्वभाव हसरा आणि मनमिळावू असल्यामुळे ती खूप लवकर दुसऱ्यांना आपलंसं करून घेत होती .   

               रमयंती रूम शेअरिंगपासून एक वर्ष रेवा सोबत घालवलेला तो प्रत्येक क्षण आठवण्यात मग्न झाली होती . 

      विचाराच्या तंद्रीतून बाहेर येत रमयंतीच हाताला बांधलेल्या घडीकडे लक्ष गेले सायंकाळचे सात वाजले होते .... 

बापरे ! म्हणतच ती .....

फ्लाईट मधून उतरण्याची वाट बघू लागली .  

मुंबईला पोहचताच तिने अनुरागला कॉल करून कळवले आणि सिटी हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी ऑटो केला . 

    तिकडे डॉक्टरने रेवाला होश आल्याचे कळवले . अनुरागचे आईबाबा रेवाचा सम्पूर्ण परिवार उपस्थित होता .  

   रेवाला होश आल्याचे ऐकून सर्व परिवार अत्यानंदून गेला . 

रमयंती रेवाचा रूम समोर येताच तिला रेवाच्या आई ( विमला ) दिसल्या त्यांना बघून रमयंतीला ओशाळल्या सारखे झाले . 

त्यांनी रेवाला आता होश आले असल्याचे सांगितले . ते ऐकताच रमयंतीला जीवात जीव आल्यासारखे वाटतं होते .

सर्व रेवाला भेटून आले .अनुरागने रात्री रेवा जवळ रमयंतीला थांबण्यास सांगितले . 

  "    रेवा ...... "

   आवाज ऐकताच रेवाच लक्ष गेलं ..... 

" रमयंती ....." 

  घायाळ नजरेने रेवा रमयंतीकडे  आवासून बघत होती . तिच्या उशा शेजारी बसत रमयंतीने तिचा हात हातात घेताच  

" सॉरी .... रामू ! "

ओघळत्या अश्रुधाराना ती  थांबवू शकली नाही . रमयंतीला मात्र तिच्या डोळ्यातून अश्रू 
ना अनावर घालायचा होता . तिने अश्रू पुसायला हात समोर सरसावला तोच तिचा 
हात रोखत रेवाने हात पकडून घेतला . 

" ह्या अश्रूंना मोकळा बांध फुटू दे रामू आज , तुझ्याजवळ व्यक्त व्ह्याला हे मन कासावीस होतं राहीलं पण , त्या मनाला भुरळ घातली गेली . अनेक वर्षे लोटली जीर्ण झालं होतं ते 
तू दूर होती माझ्या तुला ये तरी कसं म्हणू मी ..... थकले होते जीवनात आनंद होतो आणि तो हिरावून पण घेतला जातो तेव्हा मी माझ्या मनात निर्माण केलेले वलय कधीच विसरू
शकले नसते घात कोणी कुणाचा केला हा ..... त्या सर्वांपासून दूर निघून जायचं होतं ..."


     रमयंतीला कळतं नव्हतं ती हे काय बोलतं आहे कुणाबद्दल बोलते आहे . 

" रेवा तू कुणाबद्दल बोलतं आहे . अनेक वर्षांपासून तू कोणती गोष्ट मनात डांबून ठेवली होती ? कोणी कुणाचा घात केला ? आणि ती सर्व कोण होती ? आणि आता कुठे आहेत ? 
तू त्या सर्वांमुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला का ? की त्यांनी तुला आत्महत्या करायला भाग पाडले ...  "

एका दमात रमयंतीने मनात उकलखात असलेली सर्व प्रश्न रेवाला विचारली . 

" ती .... ती सर्व माझ्या हृदयाच्या कप्प्यात खोलवर रुजलेली मुळे आहेत ! 
  
   मला ते आत्महत्या करायला भाग कसे पाडतील ??  माझ्या सुखाची आशा करणारे ते 

माझ्यावर एखाद्या गुन्हेगारासारखे ह्या घडीला नाराज आहेत ... त्या घटनेत मी कुठेच

भागीदार नसताना  स्वतः ला सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही .... "

  आता रमयंतीला कळून चुकले ती तिच्या मित्रांबद्दल बोलतं असावी म्हणून 

" तू तुझ्या मित्रांबद्दल बोलते आहे ना ? "

" हहह हो  धर्म , जन्म , मृत्यू ,  व्याधी , नियती .... अपेक्षा ,  आणि अभय हा सर्व माझा

मैत्री समूह असाच जीवणघडीला व्याप्त असणारा . "

अस म्हणतच ती हसली .

" काय चावट बोलतेस धर्म , जन्म आणि मृत्यू हे ही मित्र झालेत हं तुझे ? " 

" हो ना ! तेच तर तुला कसं कळणार त्याच्या बाबीत असच काही घडलं म्हणून मी त्या 

मित्रांची वास्तविक नावेच काय ते विसरून जाता ही नावे त्यांना दिली . हा  ती नावे विसरली नाहीच मुळात मी .  "

" तू शब्द जाळ्यात अडकवते आहेस मला हो ना ! त्यांची वास्तविक नावे काय होती मग ? सांगशील का जरा ...." 

रेवा मुळात खरं तेच तिला सांगत होती . तीच कोड्यात टाकणार बोलणं क्षणभरासाठी 

रमयंतीला ते तत्सम वाटावं असच झालं . 

" नाही मी शब्द जाळ्यात नाही अडकवत आहेच मुळीच तुला , हो सांगते अगं ... "

रमयंतीला तिचं बोलणं  भ्रमिष्ट करणार वाटतं होतं परंतु तिच्या डोळ्यात सत्य साठवून 

ठेवले होते . ते तिच्या सांगण्यातून झळकत होते . 

" तुला ठाव असावं माणसालाही एक्सपायरी डेट राहते ! त्याला आपण एखाद्या वस्तूची एक्सपायरी संपली तसं फेकून देताना माणसाला कसं टाकून  देऊ ? 

माझी एक्सपायरी संपायची असेल कदाचित ती किती दिवसाची असावी हे ती वस्तू किंवा माणूस सुचवू शकतं नाही ! हे दुर्दैवाने माणसाच्या बाबतीतच खपत आलंय अस नाही का वाटतं ? नाहीतर आत्महत्येच्या नावाखाली हातपाय तोडून बसल्याचा आव यावा असच माझ्या सोबत घडलं आज .  मला मरायचं होतं पण , मरणाने माझी जगण्यातून काही सुटका नाही केली .... ह्यालाही नियतीचा खेळच म्हणावं का गं ? "

" घे मजाक करून तू ना रेवा सिरिअसली जाम एखाद्याला उडवून घेते . आता वस्तूची तुलना माणसासोबत नको करून घेऊ ये आणि काय हे  मरायचंं खूळ डोक्यात शिरलं तरी कसं ये तुझ्या  ... " 

    आयुष्यभर एखादी मैत्रीचं नातं जपावं आणि ते चिरकाळ टिकाव , असं वाटतं असलं तरी इथे सर्व काही क्षणिक असते हेच कळायला वेळ लागतो . जेव्हा कळते तेव्हा उगाच शोक करत ते आठवत  येणारा प्रत्येक दिवस डोक्यातून ते जावंच नाही असा  गर्भजल करत जगणं मूर्खपणाच वाटतं  .  

            हो , रेवा ती भळभती जखम घेऊन जगत होती .  वेदनांनी पिळवटलेल्या चेऱ्यावर थोडं बहुत समाधानी हसू  ओसरावं . त्या वेदनेतून असह्य होणाऱ्या आठवणी ताज्या करण्यासाठी रेवा रमयंतीला बऱ्या बोलाणं सांगायचं ठरवते . 

        एका मध्यम आकाराच्या खोलीत  रेवा सोबत रमयंती त्या रात्री थांबलेली असते 

रात्रीचे जवळ जवळ अकरा वाजलेले असते डॉक्टर शेवटचा राऊंड पूर्ण करण्यासाठी येतात  . रेवाला आरामाची गरज असून तिने आता झोपून जावे असे सुचवत ते 
रूमच्या बाहेर पडतात . 

मिणमिणत्या लालसर झिरो लाईटचा प्रकाश रूममध्ये पसरलेला असतो .

ती आपल्या भूतकाळात शिरते . एकूणच आपण आत्महत्या करायचा प्रयत्न का केला 

हे ती रामूला सांगू लागते . 

महाराष्ट्रात पालघर तालुक्यात माहीमच्या उत्तरेला 5 कि . मी अंतरावर शिरगावचा किल्ला आहे . त्या किल्ल्याला चार कोपऱ्यांत चार बुरूज असून प्रवेशद्वाराजवळही एक बुरूज आहे. प्रवेशद्वाराच्या वर एक अत्यंत सुबक बांधणीचा चबुतरा आहे. हा चबुतरा आपल्यला रायगडावरील महाराजांच्या समाधीची आठवण करून देतो. येथील तटबंदीवर, बुरुजांवर जाण्यासाठी किल्ल्याच्या आत असणाऱ्या तटबंदीच्या बाहेरून पायऱ्या असल्या तरी बुरुजांवर जायला तटबंदीच्या अंतर्भागातूनही पायऱ्या केलेल्या आहेत. अर्थात आतून जाणाऱ्या पायऱ्या सध्या वापरात नसल्या तरी बुरुजाला असलेल्या खिडक्यांमधून आपल्याला या पायऱ्या दिसतात. किल्ल्याच्या पश्चिमेकडील तटबंदीत आणखी एक दरवाजा आहे. मात्र आता तो पूर्णपणे बंद केलेला आहे. किल्ल्याच्या तटबंदीवरून पश्चिमेकडे असणाऱ्या समुद्रकिनाऱ्याचे सुंदर दृश्य दिसते.

  शिरगावचा किल्ल्यापाठचा समुद्रकिनारा अत्यंत सुंदर असून किल्ला तसा दुर्लक्षित असल्याने समुद्रकिनाराही निर्मनुष्य असतो. भयाण शांतता आणि रम्य असा निसर्ग 
परिसर मनाला मोहून घेतो .  त्या किल्ल्यात पुरातन काळापासून शिव मंदिर आहे 
मध्ययुगीन भारतातील भव्यदीप वास्तू आकृष्ट करून घ्यावी असा त्या परिसरात जांभा 
दगड बसवला होता . प्राचीन दगडी भिंताडावर उगवलेली झुडपं दुर्मिळ असणारे 
आकाशाला गवसणी घालणारे उंच वृक्ष . अवचित त्यांच्या उडणाऱ्या पाकळ्या .
एक स्वयंसिद्ध शांतता आहे तिथं . 

  ..... पहाटे पहाटे तिथल्या मंदिरात शिवलिंगावर ताजी फुले वाहिलेली दिसतात . 
        
     महाभारतात चिरंजीवित्वाचा शाप लाभलेल्या  अश्वत्थामाप्रमाणे प्रद्युमन तिथे जाऊन 
भल्या पहाटे कोणी आपल्याला येताना बघणार नाही ह्या उद्देशाने तिथे जाऊन पिंडावर 
डोकं टेकवून यायचा . 

           प्रद्युमनची अशी धारणा होती त्याच मंदिरात त्याला जन्मदेणाऱ्या आईने 
शिवाला अर्पण करून ती तिथून निघून गेली . एका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष असलेल्या 
इसमाने त्याला रडताना बघितले आणि तो त्याला उचलून तिथून आपल्या घरी घेऊन गेला .  समोर त्याचा सांभाळ त्यानेच केला .  गॉन नावाच्या  ख्रिस्तीने त्याला प्रद्युमन हे नाव दिले . प्रद्युमन म्हणायचा मी माझ्या नावाचा राजा म्हणून तो मला घोषित करू लागला . प्रद्युमन हे कृष्णाच्या मुलाचे नाव होते . त्यांना फॉरेन्सिक नावपेक्षा ह्या नावावर प्रेम अधिक असल्याचे दिसून आले . पण , त्यांना कधी म्हटलं की कृष्णाला किती बायका होत्या आणि प्रद्युमन कोणत्या बायकोचा मुलगा ? अस तोंडातून शब्द बाहेर पडताच ते 
हसायला लागायचे . 

      प्रद्युमन खरचं खूप अबोल मुलगा होता पण त्याच्याकडे मी स्वीटटॉकर म्हणून बघायची . त्याचं हळूवार मंद बोलणं कधीकधी नदीप्रवाहाच्या संथपणे वाहणाऱ्या धारे प्रमाणं वाटायचं ..

      ह्या प्रद्युमन सोबत माझी ओळख झाली ती डिएसपी स्कूल मध्ये सातवीत शिकत 
असताना . 

     मला भाषण देण्याची खूप आवड होती आधीच्या दिवस पर्यंत तर मी कागद समोर घेत उठता बसता खाताना पिताना झोपी जाईपर्यंत कागद घेऊन सारखी बडबडत राहायची . 

    सातवीत असताना तो नवीन आलेला पण पहिल्याच वर्षी त्याचं चक्क भाषणाच्या यादीत नाव .  वर्गात कुणासोबत न बोलणारा हा मुलगा कधी वर्गाच्या बाहेर न पडता वर्गातच खाली मान घालून लंच ब्रेक मध्येही लिहिताना दिसायचा तर कधी साध्या कॅमकोर्डरवर , आणि थोड्याफार विचित्र आवारात वावरताना दिसायचा . 
       
       तो स्टेजवर गेला की महाजांभई देणारा शिक्षकवृंदही त्याच्यात गुरफटत जायचा की बस्स . हे गुरफटून जाणं म्हणजे मला त्याच्या भाषणाकृत मर्यादित न वाटता 
छळत राहायचं .  तो बोलताना आर्त मनाला स्वच्छ धुवून टाकायचा अस वाटायचं . 
   
बघता बघता त्याने भाषणात मलाही मागे टाकलं . हातात कागद घेऊन उभा असलेला मी त्याला कधीच बघितलं नाही .   मला वाटतं माझ्या सारखं भाषणपाठ करून स्टेजवर जाणारा तो नव्हताच .  शब्द हेच त्याचं माध्यम होतं .  

      इतर माझ्या मित्रात मी त्यांच्यात दिसणारे गुण कधीच नाही बघितले . प्रद्युमन नेहमी 
नव्वद  टक्के पडायचा पण नव्वदच्या पुढे त्याला का जायचं नाही हे खूप उशिरा 
समजले . त्याला पहिला येऊन कुणासोबत आपल्या गुणवत्तेची तुलना करायला कधीच आवडायचं नाही . 
     
        केतकी , सँडी , अभय , डॅन  ह्याची साथ सोडून मी कुणासोबतच मैत्री करायला 
धजावत नसे पण का कुणास ठाऊक ! मला प्रद्युमनला माझ्या मैत्रीत  समाविष्ट 
करून घ्यायचे होते .  

      आठवी  आणि नववी असच निघून गेलं पण त्याच्या सोबत मैत्री करण्याचे माझे प्लॅन फसतच आले ह्याची कल्पना त्याला असावीच . 

    केतकीत आणि माझ्यात शर्त लागली ती अशी प्रद्युमन आपल्या मैत्रीत समाविष्ट होणारच नाही आणि मी म्हणायची , 

" झाली  तर बघ ह !  ही मैत्री आजन्म टिकवून दाखवेल तुला . "

माझ्या ह्या वाक्यावर केतकी बोलली , 

" आजन्म काय इथे दोन वर्षे आणि दोन दिवसातील माणुसकीचं अंतर मोजता येन अवघड आहे . "  ( केतकी आणि आमच्या मैत्रीच्या बाबतीत असंच घडलं ) 

डॅन तेवढ्यात आमच्यात डोकावत म्हणाला , " मी शंभर  शब्दात सांगू शकतो ! नो , नोss नेव्हर , नेव्हर , नेव्हर , नेव्हर , नेव्हर , नेव्हर , नेव्हर , नेव्हर , नेव्हर , नेव्हर  , नेव्हर , नेव्हर , नेव्हर , नेव्हर .....!", 

ये चूप चूप कर म्हणत अभयनं त्याला रोखलं . तो शेवटचं वाक्य बोलून गेला जे अजूनही 
मला डॅन काल बोलून गेल्यासारखा वाटतं . हेच की , 

" प्रद्युमन आपला मित्र कधीच नाही होऊ शकतं . "

" यू व्हॉट ? तू जीझस आहेस ? "

  एवढा वेळ शांत बसलेली सँडी चवताळलीच .  

          कधीकधी आपण जी गोष्ट मिळवायची आहे त्या मागे हात धुन  लागत असतो ती मिळे पर्यंत सुस्त बसतच नाही . आणि ती गोष्ट मिळालीच नाही तर नवलच ! 
( जगात अशक्य असं काहीच नाही . )

    कमी मार्क्स मिळाले म्हणून मी वर्गात डिटेलिंग करत बसली . माझा नंबर हुकला होता आणि पहिल्या क्रमांकावर अभय होता . ती सर्व खूप हॅपी होती पण मनातून मला अस्वस्थ वाटू लागले होते . 

का वाटावे अस्वस्थ , माझ्या डोळ्याला आपलाच कोणी तरी मित्र पहिल्या क्रमांकाने आल्याचे शल्य वाटतं होते की कमी मार्क्स मिळून एकही नंबर न कमवल्याचे ते दुःख होते ? 
     
       केतकी आणि सँडी मला खेळायला चालण्यासाठी आग्रह करत होत्या त्यांचा तो आग्रह मोडून वर्गात हेडडाऊन करत मी एकटीच बसलेली होती . 

  माझं लक्ष अचानक प्रद्युमनकडे गेलं . तो काहीतरी लिहीत असावा मला वाटलं तो 

कविता लिहीत असेल . मी त्याच्या बेंचच्या शेजारी उभं राहून डोकावून बघितलं तर तो 

मॅथ्सच्या सरानी दिलेलं होमवर्क क्लास मध्येच पूर्ण करत होता .  

     तो मागे वळला त्याला मी तिथे उभी असल्याची चाहूल लागली असावी .  माझ्याकडे मागे वळून बघतच तो म्हणाला  , 

" असं मागे उभी राहून डोकावून का बघते आहेस ? "

   मी निरुत्तर झाली त्याच्या बेंच जवळ जातं , 

" तू  होमवर्क क्लास मधेच का करतो ? " 

त्यावर तो स्मित हास्य करीत म्हणाला , 

" मला होमवर्क क्लास मधेच करून घ्यायला आवडते , घरी गेल्यावर मला खूप कामे असतात .  "

त्या वेळेला मी चकित झाली आणि त्याला म्हणाली , 

" तुला ह्या परीक्षेला किती टक्के मिळाले ? " 

त्याने उत्तर दिलं , " बघितलं नाही मी . " आणि त्यांनी मला किती टक्के मिळाले 

हे ही विचारलं नाही ह्यावरून मला वाटलं तो टक्क्यांना एवढं महत्व देत नसावा
म्हणून मी त्याला म्हटलं , " का तुला बघायचं नाही का तुला किती मार्क्स मिळाले . "

त्यावर तो बोलला , " मला माहिती आहे मला किती मार्क्स आहेत नव्वदच्या अलीकडेही नसणार आणि पलीकडेही नसणार माझं टार्गेटच नाईन्टी आहे . "

मी ओहह म्हणतच तो म्हणाला , 

" व्हाय आर यू  सॅड ? "

त्याला कसं कळलं असावं मी नाराज असल्याचं ? तो खरंच गूढ वाटायला लागला  मला . 

मी " नो नथीग ...आय एम नॉट सॅड ! " म्हणत त्याला अपवाद सोडला . 

त्याला त्या दिवशी मी म्हटलं , " प्रद्युमन तू माझ्या सोबत मैत्री करशील का ? " 

त्याने होकारार्थी मान हलवली त्याच्या होकाराने मी आनंदून गेली . 
   
   त्या दिवसापासून प्रद्युमन आमच्यात सहभागी झाला . 

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED