प्रद्युमनचा स्वभाव मला कधी उलगडला नाही . त्याच वागणं मला दुर्लक्षीत वाटायचं . कधी त्याच चर्च मध्ये सँडी सोबत जाणं आणि तिथे जाऊन सुरेल संगीतात सहभागी होणं . तर कधी प्रत्यक्षात चर्चमध्ये तो स्वतःच संगीत सादर करीत असे .
जेव्हा प्रद्युमन माऊथ ऑर्गन वाजवायचा तेव्हा चर्च मध्ये उपस्थित सर्व मंडळी मन एकाग्र करून प्रद्युमनच्या वाजवण्याकडे लक्ष केंद्रीत करून ऐकायची .
एकदा सँडी कडून मी त्याची स्तुती ऐकली आणि मला राहवलं नाही म्हणून मी तिला म्हणाली , " मला पण प्रद्युमनच संगीत ऐकायला चर्च मध्ये घेऊन चल ना ! "
तिथे गेल्यावर समजलं मला . खूप निरागस शांतता विस्तारलेली असते त्या ठिकाणी जाऊन
मन प्रसन्न होते . हे अनुभवतांना खरचं जेवढा आनंद मिळतो तेवढं आत्मिक सुख कशात असेल ??
एकदा प्रद्युमनला मी बौद्ध भिक्षु सोबत बोलताना पाहिल . तो त्यांना किती आदराने नमन करत होता . काषाय वस्त्र परिधान केलेली त्यांची मुद्रा किती विलक्षण होती .
चेहऱ्यावर तेज बघताना वाटायचं जणू सूर्य पुत्र धर्तीवर अवतरले की काय !
प्रद्युमनला ते गेल्यानंतर जवळ जाऊन मी विचारले ,
" तू त्यांच्या सोबत काय बोलत होता आणि तू त्यांना संस्कृत भाषेत कोणतं वाक्य बोलला ?? "
तेव्हा तो मला सांगू लागला , " अगं ती संस्कृत भाषा नाही आहे ती पाली भाषा आहे , आणि मी त्यांना आदराने वंदन करत अहं वंदामी भन्ते ! म्हटलं .... सिद्धार्थ बुद्धाने ह्या भाषेतून बौद्ध धर्माचा प्रचार केला . पाली भाषेत सांगायचे झाल्यास कितीतरी गाथा आहेत ज्या प्रत्येक मानवाच्या हिताची रक्षा करतात . आपल्याकडे भारतात बहुतांश 10 गाथा च्या वर भन्तेना एवढ्या गाथा अवगत नसणार पण चीन आणि जपान सारख्या बुद्धतम देशात हजार हजार गाथा भन्तेना मुखपाट आहेत . "
प्रद्युमनच्या बोलनायवरून मला वाटलं त्याला ह्या धर्माचे खूप ज्ञान आहे म्हणून मी त्याला एक प्रश्न विचारला मला ह्याचे आज पर्यंत कधीच समाधानकारक उत्तर कुणाचं कळून मिळाले नाही ... लहानपणी मी बुद्ध कथा वाचायची आणि भारावून जायची . पण हिंदू धर्मात असल्याने बुद्धाची आवड आणि आपले पण कधी नव्हे ते मनातच नाश पावलं .
" प्रद्युमन , मला सांग सिद्धार्थ बुद्ध का झाले ?? "
माझ्याकडे नजर रोखून बघत प्रद्युमन मला म्हणाला , " तुला माहिती नाही अजून पर्यंत ? "
मला माहिती होत त्यांचं संसारात मन रमत नव्हतं . तो काही हरकत नाही मी सांगतो म्हणाला , " सिद्धार्थ एक राज्याचा मुलगा होता तो शाक्य संघाचा सभासद होता त्यावेळी रोहिणी नदीवरून वाद झाला . शाक्य आणि कोलीय हे दोन संघ होते आणि त्या संघाचे सदस्य ह्या वर्षी रोहिणी नदीचे पाणी कोण वापरणार म्हणून ठरवत होते . कधीकधी ह्या नदीच्या पाण्यासाठी युद्ध व्हायचे . कारण नदीचे पाणी शेतीसाठीही वापरण्यात यायचे .
रोहिणी नदीच्या वादावरून शाक्य संघाने युद्धाची घोषणा केली . पण , सिध्दार्थला हे युद्ध नको होते त्याचे मत होते की युद्ध करून जिवंत व वित्त हानी होते युद्धाने काहीच साध्य करता येणार नाही युद्ध शक्याच्या आणि कोलीयच्या हिताचे नाही . सिद्धार्थचे असे बोलणे संघाच्या विरोधात होते . सिद्धार्थला युद्धात सहभागी व्हायचे नव्हते म्हणून सेनापतीने त्याच्या समोर प्रस्ताव ठेवले . 1) फाशीची शिक्षा 2 ) त्यांच्या कुटुंबाच्या जमिनी आणि संपत्ती घेण्यात येईल 3) देशद्रोहाची शिक्षा . सिद्धार्थ सभेत म्हणाला , " मी परिवाजर्क होतो आणि घर सोडून जातो हा ही देशत्यागच आहे . सिद्धार्थ तिसऱ्या मार्गाचा अवलंब करत सभेतून बाहेर पडला . सभेतून अध्यक्षपद त्याच्याकडून काढून घेण्यात आले . त्यानंतर तो त्याच रात्री राज त्याग करून महालाच्या बाहेर पडला . तीच घटना सिध्दार्थला बुद्ध बनण्यास प्रेरक ठरली . त्याने खूप दिवस काही ऋषींच्या आचरणात दिवस काढले पण त्याला दुःखाचा मार्ग मिळतं नव्हता म्हणून तो स्वतः पिंपळ वृक्षाखाली बसून ध्यान करू लागला . त्याला मानवजातीला दुःखातून मुक्त करायचे होते . तो सहा सहा महिने कठोर विपश्यना करायचा पण दुःख मुक्ती चा मार्ग प्राप्त होत नव्हता काही काळानंतर ध्यान धारना करून त्याला दिव्यज्ञानाची प्राप्ती झाली . आणि सिद्धार्थ बुद्ध झाला . "
मी आवाक झाली किती माहिती आहे ह्याला म्हणत मला सिद्धार्थ बुद्ध का झाले ह्याचे मूळ कारण सापडले ते प्रद्युमन मुळेच . मी त्याला म्हणाली ,
" तू बुद्धापासून काय शिकला ?? " त्या वर तो एक सुरेख वाक्य बोलला
" अत्त दीप भव ! "
मला ह्या साध्या आणि सोप्या तीन शब्दाचा अर्थच कळला नाही . तेव्हा मी त्याला म्हणाली , " म्हणजे ? " त्याने स्पष्टीकरण दिले .
" म्हणजे स्वतःच स्वतःचा दीप हो .... "
बुद्ध म्हणजे करुणेची मूर्ती आणि शांतीचे प्रतीक मानवाला मैत्रीची शिकवण देणारे .
प्रद्युमनच्या बाबतीत मला काही विचित्रच कोडं वाटतं होतं . तो सांगायचा माझा जन्म एका मुस्लिम धर्मात झाला आणि बाळकडू तरुणपणा पर्यत मिळणारी शिकवण ती ख्रिचन धर्माची आणि नाव ते हिंदूंचे !
तो एकदा अभय आणि डॅनला म्हणाला ,
" तुम्हाला माझ्या वागण्यावरून किंवा माझ्या रक्तात मी मुस्लिम असल्याचे काही भिनले आहे असं नाही का वाटतं कधीच ? "
मी सुद्धा तिथेच बसलेली होती त्याच हे वाक्य ऐकून सँडी आणि मी तर खळखळून हसलो . तेव्हा तो आम्हाला म्हणाला , " अरे हस्तांय काय सांगा ना ! "
तेव्हा आमच्यातला अभय म्हणाला , " नाही असं कधीच नाही वाटलं आम्हाला खर तर तू हिंदू की ख्रिचन आहे हेच कुणाला कळणार नाही . "
प्रद्युमन आम्हाला सांगत होता , " ज्या वेळेला माझी जन्मदात्री मला शंकराच्या पिडीवर सोडून गेली त्या वेळी मला डॅड ( गॉन ) तिथून घेऊन आले तेव्हा ते मला सांगत होते माझ्या गळ्यात हिरव्यारंगाचे ताविज बांधून होते जे मुस्लिम नवजात शिशूला बांधतात . "