lifezon - 6 books and stories free download online pdf in Marathi

लाईफझोन ( भाग -6)

 
   एड्स ..... एड्स ..... म्हणजे मृत्यूला आमंत्रण ! 

        अभयला एड्स झाला ...... हे प्रद्युमन कडून कळताच मी पार हादरून गेले .

    पण अभय तसा नव्हता अरे  कसं शक्य आहे त्याच्या सारख्या मुलाला एड्सने 

ग्रासले ? 

 " काही उपचार नाही आता तो लास्ट स्टेजवर आहे जगण्याशी लढून राहिला तो 

तिथे . जेव्हा अभयला डॉक्टरांनी त्याच्या प्रकृतीबद्दल तपासून एड्स झाले असल्याचे सांगितले , त्यावेळी त्याला झालेले दुःख नियतीचा कट म्हणून पचवून घेतले होते . 
कुणालाच काही दोष न देता , स्वतः च्या नशिबाला बोल न लावता अभय मला शेवटी एवढंच बोलून गेला माझे कोणत्याच मुली सोबत शारीरिक संबंध नव्हते हे माझ्या सोबत कसं घडलं काय घडलं मला नाही माहिती पण तू माझा मित्र म्हणून माझ्यावर विश्वास ठेव मी तसा नाही रे .....  आणि त्या नंतर मी त्याला दोन दिवस कॉल करतो आहे तो फोन घेत नाही . चल आपण दुबईला निघुया ...... "

      प्रद्युमन , डॅन , सँडी मी आम्ही एअरपोर्टवर पोहचताच  अभयच्या एका मित्राचा 

डॅनला कॉल आला .... 

        "   सकाळपासून अभयने काहीही खाल्लं नाही ना त्याने तोंडून एक शब्द उच्चारला
. आता सायंकाळचे सात वाजायला आले होते . 

   अभयचा श्वास मंदावत चालला होता . 

    तुला माहिती आहे डॅन हे सर्व कसं घडलं ? आम्ही ह्याचा खूप शोध घेतला 

अभय सकाळी उठल्यापासून कॉलेज सुटल्यानंतर रूमवर जात पर्यंत कुठे थांबत होता काय करत होता सर्व गोष्टी पडताळून पाहत होतो . 

   तेव्हा लक्षात आले आणि काल अभयने स्वतः सांगितले . मी एका स्टॉलवर बाहेर 

भेळ खायचो रोज . कारण सकाळी त्याला 9 च कॉलेज असल्यामुळे जेवण मिळायच नाही तर तो तिथून भेळ खाऊन यायचा . 

एकदा  असच अभय सकाळी भेळ खायला गेला होता तो खूप घाईत होता .  त्यामुळे त्यांनी दुर्लक्ष केलं . भेळ बनवणाऱ्याच कांदा कापताना बोटं कापलं आणि तो बोटाला रक्त लागलं असतांना कांदा कापतच होता तो कापलेला कांदा त्यांनी अभयचा भेळवर टाकला . अभयला वाटलं आपल्या भेळवर टाकलेल्या कांद्यावर कुठे ब्लड लागलंय ? त्याने तो खाऊन घेतला . हे खूप उशिराने त्याच्या निदर्शनास आले . 

आम्ही सर्व मित्र त्या भेळच्या स्टॉलकडे गेलो त्याला आम्ही जाब विचारला तर तो खरं उत्तरला त्यालाच एड्स आहे म्हणून . आणि त्याच्या मार्फत तो कुणाला झाला तर तो व्यक्ती वाचू शकत नाही . कारण एड्स हा ब्लडने दुसऱ्याकडे संकर्मित होणार असा आजार आहे ... खरचं निष्पाप अभयचा जीव घेतला ह्या बिमारीने पण आपण काय करू 

शकत होतो तो शेवटच्या स्टेजवर मृत्यूशी झुंज देत होता .... "

    डॅन म्हणाला , " एक मिनिट एक मिनिटं ...... अभय अभय ??? "

" अभय .... कुणालाच कशाची चाहुलही न लागू देता ... अभयने आज सायंकाळी आपला अखेरचा श्वास घेतला ...."

   कुणालाही न दिसेल अशा ठिकाणी अभय पोहचला होता . 

कुणालाच काही त्रास न देता .... अभय अभयने आपले अस्तित्व कायमचे संपविले होते ...

आम्हाला भेटण्याची त्याची  शेवटची इच्छा मरेपर्यंत पूर्ण होऊ शकली नाही ... 

' अभय मेला ' साऱ्यांनी एकच टाहो फोडला .

मागे राहिला तो अभयचा आनंदी हसरा चेहरा !

  निर्मळ मनाच्या अभयचा असा करून अंत व्हावा .... कठोर पाषाणालाही पाझर फुटावा 

कुणाचंही अंतःकरण हादरून उठाव ...

काय दोष होता अभयचा ? 

हाच की , तो साऱ्यांना आवडायचा आमच्या जिवलग मित्रातला एक मित्र हरवला 

केतकी गेल्यानंतर हा दुसरा आघात होता ..

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED