तसं बघितलं तर आपण ह्या निसर्गाचाच घटक अहो त्या निसर्गाशी संलग्न साधायला
आपल्याला काही त्राण नाही . सकाळी रोज पहाटे चारला उठून अर्धकाळोखात विलीन झालेल्या , चांदण्याचा पहुडलेला तो अवकाश लखलखुन टाकणारा सडा .... चंद्र आणि सोबतीला काळोख त्या प्रसंगी एवढा शुकशुकाट आणि शांतता विस्तारलेली असते . बहुतांश भविष्याची कितीतरी स्वप्न मी ह्याच प्रांगणात रोज सकाळी चारला बाहेर पडून
अवकाशाकडे वर मानेने उघड्या डोळ्यांनी बघितलेली आहे .... माझा पूर्ण विश्वास आहे ते खरेही होतात . ती हवा आपल्या बाहुपाशात एक वेगळीच ऊर्जा शक्ती आणि बळ आपल्याला देऊन
जाते . एकदा करून बघा खूप आनंद होईल .... आणि हे एकदा नाही तर रोज रोज आणि रोज सकाळी उठून ....... नवचैतन्य निर्माण होईल तुमच्यात !
कधी कधी त्या भल्या पहाटे मला जास्त लख्ख माझ्या नजरेत चमकणारी चांदणी म्हणजे
केतकी वाटते आणि असाच एक तारा मला कुठे दिसतोय का म्हणून मी
अभयचा शोध घेतो .... '
असं म्हणतच प्रद्युमन उदास झाला ...
' अरे बोल बोल प्रद्युमन आम्हालाही कळू दे तुझं मन .... आम्हालाही खूप आठवण येते अरे त्यांची पण हे खूळ आम्हाला कधी अवगत झालंच नाही .... '
माझ्या ह्या बोलण्यावर प्रद्युमन म्हणाला ,
' अगं ते कुठे असतील आता माहिती नाही पण नेहमी आनंदी असो कधीकधी मन वेड होतं ग त्यांना चांदण्यात शोधायला . कधी वाटतं ते जिथे कुठे असतील तिथून त्यांना आपल्या सोबत इथे गप्पा करायला बोलवून घ्यावं . पण , काय करणार ते दिसुच शकत नाही त्यांचं अस्तित्व एकेकाळी ह्या भूतलावर होतं आता जगाच्यापाठीवर ती कुठेच नाही ... '
सँडी जरा कातर स्वरात म्हणाली ,
' जीवन कधी कधी भकास वाटायला लागतं यारोहो .... त्यात उरते केवळ कृत्रिमता आणि त्या कृत्रिमतेत विकृत भावना जन्म घायला लागतात ..'
तिच्या ह्या वाक्यावर डॅन हळूच म्हणाला , '
अगं सँडी आयुष्याला एवढं सिरिअस कधीच नाही घ्यायचं जे झालं ते बस्स विसरून
पुढे चालायचं तेव्हाच जगण्याची कला अवगत होईल . '
' अगदी बरोबर बोलला डॅन तू ... आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतो आपलं मन नेहमी निर्मळ अगदी पाण्यासारखं स्वच्छ प्रांजळ ठेवण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात जगायचं .. '
प्रद्युमन डॅनकडे आता बघून मात्र मंद हसत होता ... आम्हा दोघीना त्यांच्या हसण्याचा मागचं कारण कळू नाही लागलं .... तेव्हा हसताय काय असे म्हणून मी प्रद्युमनला विचारलं ...
तेव्हा डॅन त्याला चूप राहायला इशारा देत होता . काय गुपित असावं . कळत नव्हतं दोघेही काहितरी आमच्यापासून लपवत होते .
' ये प्रद्युमन चूप राहा यार .... अगं रेवा सँडी काहिनाही हा उगाच असा हसतो आहे .
तू ना प्रद्युमन एकटा भेट मला मग बघ ..... ' अस म्हणत दोघेही खडकावरून उठून एकमेकांच्या मागे धावत होते .
किनाऱ्यापर्यंत पोहचले होते दोघेही . डॅन धावतच सँडीमागे येऊन दडला आणि प्रद्युमन क्यू छुप रहा हे अब म्हणत मोठ्यांनी हसत होता ...
आम्ही काय झालं म्हणून चांगलाच तगादा लावला डॅनच्या मागे ...
तेव्हा प्रद्युमन आम्हा दोघींना म्हणाला , ' अरे हा काय सांगेल तुम्हाला मीच सांगतो ... ये सांगू ना डॅन ? ' डॅन नाही नाही म्हणत असतांना प्रद्युमन मोठ्यांनी ओरडला
तो त्याचा आवाज समुद्राच्या चारही दिशेने गुंजत राहिला ....
' आपला मित्र डॅन ..... डॅन लग्न करतो आहे . '
ते वाक्य ऐकून आम्हीही खूप खुश झालो . पण त्याला चिडवायचे म्हणून
सँडी म्हणाली ,
' आता तर वहिनी साहेब येणार मग डॅन आपल्याला विसरणार आहे बरं का प्रद्युमन आणि रेवा हा आपल्याला मिस पण करणार नाही . '
' ये सँडी नको ना अस बोलू यार ती येणार असली तरी त्या आधी आपण बालमित्र आहोत , एकमेकांच्या सुख दुःखात वाटेकरी आहोत हे विसरू नकोस .... ' सँडीने
डॅन चा हात हाती घेतला त्या सोबतच त्याच्या हातावर माझा आणि प्रद्युमनचा हाताची भर पडली ...
डॅन ज्या मुली सोबत लग्न करणार होता त्या मुलीवर तो जीवापाड प्रेम करत होता हे आम्हाला त्याच्याकडून खूप उशिरा कळले .
डॅन आणि जिनी ह्याचे लग्न व्यवस्थित पार पडले .