lifezon - 5 books and stories free download online pdf in Marathi

लाईफझोन (भाग -5)        कातरवेळच्या रम्य संध्याकाळी मनात निर्माण झालेल्या वादळाने मला वेडावून घेतलं  . का कोण जाणे ? जीवन मरण ह्यातलं गूढ ,  दोन दिवसाआधी रस्त्याने जाताना  
वाटेत आमची भेट झाली ती शेवटचीच . 
   
          नैराश्याच्या गर्देत मी गुरफटून गेले होते कळतं नव्हतं धाय मोकळून आज मी कुणाजवळ रडू ?? 

   मी ज्या मनस्थितीतुन जात आहे त्याच मनस्थितीतुन सँडी , प्रद्युमन आणि डॅन जात असावे कदाचित .... पण , 

   आज नैराश्याने मला खूप पोखरून घेतलं असं वाटतंय दुःख आणि क्षणिक वाटायला येणारा आनंद 

तो आनंद की दुःखावर सांत्वन  ?  माझा पाठलाग कायम करणार का ही संकट ? 

नाही हताश होऊन संकटाच्या आधीन नाही व्हायचंय मला . पण कुठे जाऊ कुठे ?? 

काळोखाच्या अंधारात घुटमळता जीव कसं समजवू कसं मी त्याला ??

आशेच्या एका किरणावर मनुष्य जगतो म्हणतात . पण आशेचे सारे पाश खोटे वाटले की

चेहऱ्यावर पसरतो तो आपला भूतकाळ . आठवायला गेलं की असंख्य जखमातून रक्ताचा 

महापूर वाहून निघावा  आणि वेदनेने काळीज चिरगळत जावं असं वाटायला लागतं . 

   आयुष्यात आपल्या घडणाऱ्या प्रत्येक घटना ह्या सांगूनच कुठे बर घडतात ? ? 

किंवा पूर्वसूचना देऊनही त्या येतं नाहीत . 

     सँडीची मॉम सोडून गेली तेव्हा एक खूप जवळचा मित्र म्हणून अभयने आपल्या आईला कळवून तिला आपल्या घरी ठेवून घेतलं .  

 एवढं मोठं आव्हान त्यांनी पेललं . मैत्रीला जपलं पण त्याचं अभय सोबत नियतीने घात 

करावा ?? अशी कावेबाज नियती माणसाला जगण्यातूनच उठवते . 

        छान चाललं होतं अभयच . त्याच्या सोबत एव्हाना एकच वाईट घडलं होतं 

त्याला मेडिकल सोडून इंजिनिअरिंग करावं लागलं . बाबांना त्याच्या  त्याला इंजिनिअर 

बनवण्याचं लहानपणापासून स्वप्न होतं म्हणून . त्यांच्या त्या स्वप्नालाही अभय जागला . 

पहिल्याच वर्षी कॉलेजमध्ये  फस्ट येऊन बेस्ट इयर ऑफ द स्टुडंटचा अवॉर्ड मिळवला .

सँडी मात्र त्याच्या घरून मेडिकल करतं होती आणि हा दुबईला शिक्षणासाठी निघून गेला .

भेटत राहू ना आपण आल्यावर अस म्हणतं गोष्ट उडवून न्यायचा अभय . 

       
     दोन वर्षे त्याची तिकडे अशीच निघून गेली . त्या दोन वर्षात कॉलेजचा स्टडी खूप 

राहतो बाकी इव्हेंट्स , क्लास असतात  पंधरा दिवसासाठी मला यायला 

नाही जमायचं म्हणून तो भेटीसाठीही येऊ शकला नाही .  बोलणं काय ते कॉल वर महिन्यातून एकदा व्हायचं ... 

    कॉलेज लाईफ म्हटलं आणि मित्र असे दुरावले की आधीचे दिवस जे सोबत घालवले 

ते ही परिकथेसारखे वाटायला लागतात . 

  अभय येत्या दोन दिवसांनी भेटीला येतो असे म्हणून ह्या खेपेला कॉल करतो . आणि होतं काय अचानक त्याची तब्येत बिघडते . 

   मी ही त्याच्यावर खूप चिडलेली आम्हाला वाटलं तो न येण्यासाठी बहाना करतं असावा 

कारण दोन वर्षे उलटली आणि तो आला नाही मग काय वाटणार . पण त्यालाही कुठे तरी आठवण येत असेलच ना सर्वांची ?? 

*********

   त्या दिवशी त्याने मला पंधरा वेळा कॉल करून मी रिसिव्ह करून बोलले नाही . 

त्याला मॅसेजवर म्हटले तू इथे येत पर्यंत माझ्यासोबत अजिबात बोलूच नको आता . 

ओके लवकरच येतो मग तर बोलशील ना ! तुमच्यासर्वांची खूप आठवण येते अगं मला  तुमच्यासाठी लवकर येण्याचा प्रयत्न करतो मी , हा त्याचा मला आलेला रिप्लायही तेव्हा वाटलं सर्व कोरडा ओलावा ह्याचा . तिकडे कॉलेज मध्ये आता नवीन मित्र मैत्रिणी मिळाल्यावर ह्याला कसली आमची आठवण येते . 
  
   सँडी , प्रद्युमन , डॅन आम्ही जेव्हा एकत्र सुट्या मध्ये भेटायला आलो तेव्हा सारखी अभयची आठवण करायचो . 

   डॅन म्हणायचा , " साला अभ्या आपल्याला विसरून गेला . किती आठवण येते ह्याची येऊ दे ह्याला फक्त आता जाऊच नाही देणार परत . "


एक गंमत , प्रद्युमन म्हणायचा , " चल यार विसरून जा त्याला आता एक व्हिस्की प्यायची का ?? 

 अभ्याचा आठवणीत व्हिस्कीचा घेतलेला जीवनातला पहिला घोट तरी रेंगाळत राहिल्याची  मनात उब पेटत राहील .... "      ********
   

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED