लाईफझोन ( भाग -7) Komal Mankar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लाईफझोन ( भाग -7)

    खूप जीव होतांना अभयचा आमच्यात . त्याच्या अंतविधीवरून येऊनही 

विश्वास बसत नव्हता तो आम्हाला सोडून खूप दूर निघून गेला म्हणून .....

            मी अजूनही  तो आम्हाला भेटायला येईल म्हणून वाट बघत होती ...


     रात्रभर मी हताश मनाने पलंगावर पडली होती . आयुष्यात पहिल्यादाच आज एवढी 

निराश होती मी ... केतकीचा माझ्या हातून निसटून जाणारा हात आठवत होते . तिचा तो शेवटचा चेहरा आणि अभय रस्त्याने शेवटी जातांना ज्या दिवशी बाय म्हणतं निघून गेलेला 
त्याचा तो हसरा चेहरा . पूर्णपणे खचून गेली होती मी ....


     किती अभागी आहे मी ! जगातील सगळ्यात दुर्दैवी आहे मी ! एकही सुख माझ्या 
पदरी पडू नये ... ह्याकरता का माझा जन्म झाला ? असं वेदनेने भरलेलं जगणं 
नियतीने दोन जिवलग मित्रांना डोळ्यासमोरून जीवनातून कायमचं घालवलं ... माझ्या 
मनात नैराश्य अगदी दाटून उसळत होतं .... तोच 

' रेवा , अगं कसला एवढा विचार करतेस ? ' 

अभयचा प्रेमळ आवाज माझ्या कानी पडला . मी दचकून बोलले ,

' अभय , अभय  किती योग्य वेळी आला तू मला माहिती होतं तू कुठेही गेलेला नाहीये ...

मला तुझी फार आठवण येते आहे . '

' म्हणून तर आलोय ना ग रेवा ... मला कळलं , माझी जिवलग मैत्रीण मला खूप आठवते

आहे ... '

' होय अभय , खरचं मी खूप उदासले अरे ! '

' नाही  रेवा .... असं बोलू नकोस .... मी तुला अशी उदासलेली कधीच बघू 

शकतं नाही माझी खोडकर मैत्रीण मला नेहमी हसवत ठेवणारी आज माझ्यामुळे 

अस्वस्थ असलेली बघून मला कसं वाटतं असेल ? तू निराश नको होवू ग . '

' अभय , तूच बघ ना रे मी आयुष्यात कधीही कुठल्याही गोष्टींची आशा अपेक्षा केली नाही , प्रथम मला डॅड सोडून गेले आईला घेऊन मी एकटे ह्या घरात राहते आहे डॅडकसे होते अरे मला काहीही माहिती नाही . नंतर मला अगदी माझ्या डोळ्यादेखत केतकी सोडून गेली .
एवढ्यात सँडीची मॉम तिचं दुःखही मला माझ्या दुःख सारखंच वाटलं . आणि आता तू ....
अभय , का असं तू देखील निघून गेला ? कुठला अपराध घडला माझ्याकडून ? कुणाचं 
वाईट केलंय अरे मी .....? ' 

  माझ्या विचारण्यात आक्रोश नव्हता की अभय बद्दल चीड नव्हती , राग तर नव्हताच ...

होती ती माझ्यातली फक्त निराशा .... उदासी मी खचलेलं मन .... अगदी खिन्न स्वरात 

हळुवारपणे अभय माझ्यासोबत बोलता झाला . 

' रेवा , अशी निराशेच्या आधीन होऊ नकोस . तू किती आशावादी आहेस अशी कोमेजून जाऊ नको .... मला एकदा डोळेभरून माझ्या हसऱ्या जिवलग मैत्रिणीला हसताना बघू दे ! '

   अभयचा तो मृदू स्वर मला आणखीनच रडवून गेला . 

' रेवा यार , काय करू मी तुझ्यासाठी सांग तू म्हणशील तस करेल पण ही निराशा सोड अगं .... '

' हं .... तू परत येण रे ! प्लिज एवढं करशील का माझ्यासाठी ? '

' इथे जन्माला आलेला प्रत्येक जीव हा मरनागती जातोच  , मरण हे अटळ आहे रेवा त्यातून माझी आणि तुझी कुणाचीच सुटका होणार नाही ..... जग सोडून गेलेल्यासाठी 
कधी रडत बसू नये तू निराश होऊन रडत बसत होती म्हणून मलाही दुःख झाले आणि मी
तुझ्याजवळ आलो पण ह्या नंतर मी नाही येऊ शकणार तेव्हा तू अशीच रडत बसणार आहेस का ? निराशा जनजाळ आहे रेवा ....

    कारण नैराश्याच्या घनघोर काळ्याकुट्ट अंधारात जीवन आपण हरवून बसतो , निराशा 

पापच नाही रेवा तर आत्मघातकीही आहे . एखादा मनुष्य जर जीवनाशी संलग्न होण्याचा प्रयत्न करीत असेल तर  निराशा त्या मनुष्याला आपल्या जाळ्याच्या विळख्यात अडकवून बसते . जीवनाबद्दल थोडी जरी आशा असेल त्या आशेला मारून त्याला खचवून टाकते . 
भविष्याबद्दल त्याच्या मनात कटुता निर्माण करते .... '

' अभय  ...! ' म्हणत मी पुटपुटली .

' होय रेवा म्हणूनच तू आशेवर जग .... आशेला स्वतःभोवती घट्ट कवटाळून घे ! आशा तुला जगायला ऊर्जा  बहाल करेल .... आशाही आर्तगर्भातील खोल समुद्रासारखी असते ..तुला अजून शिकून खूप खूप मोठं व्हायचं आहे ... '

अभय बोलतं होता मला समजवत होता आणि मी मूकपणे ऐकत होते .....

' तू निराश झाली ना ग रेवा की मानसिकरित्याही खचून जाशील मॉमला कुणाचा आधार असेल मग ? त्यांच्याकडे बघ ना ! निराशाही पोकळ करते अगं मनाला ती अंधाराशी मैत्री करते . तू निराश होऊन आपलं मनोबल गमावून बसशील . तुला भविष्यात काय करायचं आहे तू हे ही विसरून जाशील ....'