लाईफझोन ( भाग - 2) Komal Mankar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

लाईफझोन ( भाग - 2)

  सुट्टी झाल्यानंतर तो घरीजाताना उंच डोंगराची सैर करून आणत होता .  आकाशात मुक्त विहार करणारे पक्षी  तो वर मान करून निरखून बघायचा . उंच गगनचुंबी भरारी घेणाऱ्या पक्षाचा त्याला 
वेध होता .  
    
     अभय डॅन ह्या दोघांची सतत आपसात कुजबुज व्हायची एखाद्या शुल्क कारणावरून ते चिडत असायचे तेव्हा प्रद्युमन त्यांना समज घालून देत मैत्रीने राहायचं सांगत होता .  

अभय तसा स्वभावाला नम्र होता डॅन त्याची मस्करी करायचा तेच त्याला आवडत नव्हते .

केतकी माझी खूप जिवलग मैत्रीण होती बालपणापासून मॉमने सांगितलं होतं आमचा दोघीचा जन्मही एकाच हॉस्पिटलमध्ये एकाच वॉर्डात एकाच दिवशी झाला ह्याचे मला 
एखाद्या चमत्कारापेक्षाही अप्रूप वाटते . 

सँडी ही एका ख्रिस्ती परिवारात जन्मलेली राजस कन्या . तिची मॉम रोज सकाळी उठून 
न चुकता तिला चर्च मध्ये घेऊन जात असे . तिच्या मॉमचे 
एका मोठ्या पोपच्या मुलांवर कॉलेज मध्ये असताना प्रेम झाले . त्यांच्या प्रेमाचा अंश  म्हणजे सँडी . सँडीचा जन्मानंतर तिच्या वडिलांनी दुसऱ्या मुलीशी धार्मिकरित्या विवाह केला . त्यामुळे सँडी आणि तिच्या आईला दुरवण्यात आले . सँडीची आई कॅथरीन मूळची पॅरिस मधली वास्तव्यास असणारी  . तिने सँडीला आपल्या आईकडे सोपवून अर्धवट राहिलेल वैद्यकीयं शिक्षण पूर्ण केलं आणि शिक्षण पूर्ण होताच  भारतात स्थायी होण्याचा निर्णय घेतला .  कारण तिची आई (कॅथरीनची ) पॅरिस मधील एका धनाढ्य व्यापाराची मुलगी असली तरी वडील भारतीय वंशाचे होते . 
        
       सँडीची आणि माझी ओळख इयत्ता पहिलीत असताना झाली . 

        डॅन मनमिळावू वृत्तीचा आणि खूप बोलका होता तो  आमच्या मागच्या बाजूस कॉलनीत रहात होता . माझ्या आणि त्याचे पप्पा चांगले मित्र होते . डॅन माझ्याच वयाचा 
असल्याने पप्पा मला त्याच्या सोबत खेळायला त्याच्या घरी नेत असतं . त्या नंतर आमचा दाखला एकाच शाळेत टाकण्यात आला . 

अभय हा माझा वर्ग मित्र . त्याची आणि माझी ओळख झाली ती पाचवीत शिकत असताना . त्या काळात  सर्वे बालीश वयात होतो . तेव्हा जुळलेली मैत्री आम्ही नंतर मोठे झाल्यावरही प्राणपणाने जप्त आलो . ही आमच्या मैत्रीची खासियत आहे . शालेय जीवनात हे मैत्रीचं निरागस वटवृक्ष आमचं होत  तसच ते कायमस्वरूपी  पवित्र आणि स्वच्छदी राहिलं . वयाने आम्ही वाढत गेलो मोठे झालो पण मैत्रीला तो मोठेपणा कधीच 
शिवला नाही . हो रस्ते मात्र बदलले . 

      नववीत असतांना आमच्या मैत्रीत भर पडली ती प्रद्युमनची . आधी आधी तो आमच्यात मैत्रीत नव्हता तेव्हा खूप वेगळा वाटायचा पण हळूहळू तो आमच्यातलाच झाला . अभय , डॅन , प्रद्युमन वर्गात एका बाकावर तिघे बसायचे त्यांना एका बाकावर बसलेलं बघून मला खूप छान वाटायचं . केतकी , सँडी आणि मी आम्हीही तिघी बसायचो .
लंच ब्रेकची आतुरतेने वाट बघत राहायचो कोणी काय स्पेशल आणलंय म्हणून . 
   एकदा काय झालं मॅथ्सच लेक्चर सुरू असतांना केतकीने तिच्या बॅग मधून बाहेर 
काढला तो टिफिन सॅडीच्या हातात ठेवत कानात कुजबुजली " ह्यात कटलेट आहे , आपण खाऊयात का ? " सॅडीने होकारार्थी मान हलवत टिफिन उघडायला सुरवात केली पण झाकण उघडत नव्हते माझ्याने पण झाकण उघडले नाही मग आम्ही शेजारच्या बेंचवर बसलेल्या डॅनकडे डबा पार्सल केला . त्याच्या हातानेही झाकण उघडेना त्याने डबा अभयकडे दिला त्याने खूप जोर लावला झाकण निघून वर उडत खाली जमिनीवर पडले त्याच्या हातून कटलेटही सांडले . टीचरला आवाज जाताच त्यांनी आम्हाला वर्गाच्या बाहेर 
जायला सांगितले . 

         वर्गाच्या बाहेर पडताच आम्ही एकमेकांना बघून हसायला लागलो . काही आठवणी 
अश्याच मनात कोरून असतात नुसत्या आठवल्या तरी मन तेवढंच नव्याने त्या खोडकर आठवणींवर खळखळून हसतं ..
      
           नववीतून दहावीत आम्ही प्रवेश केला . ते वर्ष दहावीच असल्यामुळे आम्ही पेटून अभ्यासाला लागलो . एखाद्याला एखादी विषय वर्गात नाही समजला तर ज्याचा तो आवडता विषय असायचा आम्ही त्याच्या कडून समजून घ्यायचो . टीवशन आमच्यामधून एकानेही लावलेली नव्हती . 

     त्या वर्षी शाळेत प्रोग्राम होता . लंच ब्रेकची सुट्टी झाली तेव्हा आम्ही सर्व बाहेर खेळत होतो अभय आणि प्रद्युमन वर्गातच मॅथ्स सॉल करतं बसले होते त्या दिवशी डॅन स्कूल मध्ये आला नव्हता सँडी , केतकी आणि मी एक विचित्रच खेळ खेळत होतो . आमच्या स्कूल मध्ये मोठी फुलझाडाची बाग होती तिथेच आमच्या खेळणायचं ग्राऊंड . आम्हाला खेळतांना कोणी रागावणार ह्याची भीती नव्हती . आम्ही चिनी माती आणायचो घरून जी खेळण्याची असते त्या मातीचे बॉल बनवून आम्ही एकमेकींना मारत होतो आणि बॉल लागू नये म्हणून पळायचो सुसाट वेगाने दोन दोनचा ग्रुप बनवून . सँडीवर राज होता आणि ती आम्हाला तो बॉल फेकून मारणार म्हणून आम्ही पळत सुटलो माझा हात पकडून केतकीही पळू लागली . 
                 
      दूरवरून आकाशातुन हेलिकॉप्टर येतांना दिसलं असं वाटलं ते खूप जवळून जात आहे सर्वे मूल गार्डन सोडून दूर पळाली केतकी आणि मीच काय ते त्याकडे जवळून जात आहे म्हणून बघत उभे राहिलो . ते हेलिकॉप्टर एवढ्या जवळ आलं की तिथून पळताही आले नाही क्षणात ते आमच्यावर भिरकावलं केतकीचा हात माझ्या हातातून निसटला .
मी त्या वेळला केतकिला मागेपुढे बघत गोलगोल फिरली ते हेलिकॉप्टर माझ्या डोक्यावरून गेलं माझे केस विस्कटले घार अवकाशातून येऊन आपल्यावर झडप घालून गेली असल्याचा भास झाला पण तो भास नव्हताच वास्तवात अवकाशातू  वेगाने जमिनीवर भिरकवणार हेलिकॉप्टर होतं .

    समोर जाऊन ते  काहीच अंतरावर कोसळलं .  केतकीला बघून मी किंचाळलीच . ती त्या हेलिकॉप्टरने खूप जखमी झाली होती तिच्या मानेतून रक्त व्हायला लागले . शिक्षक कॉलेजचे प्रेन्सी बाहेर आलेत . सँडी , अभय आणि प्रद्युमन हे काय झालं म्हणत केतकी जवळ आले ते तिला आवाज देऊन उठवू पाहत होते . मॅडमने तिच्या गळ्याभोवती 
दुपट्टा गुंडाळला  . मी निःशब्द झाले डोळ्यातून अश्रू ओघळू लागले नाही रक्तधाराचा आसवातून प्रलय व्हावा असे वाटत होते .  अभयने केतकी म्हणत आर्त टाहो फोडला तो आवाज आजही कानात गुंजतो . प्रद्युमन सँडी तिला केतकी काहीतरी बोल बोल म्हणून उठवत होते पण ते कळून चुकले होते केतकी आता कधीच उठणार नव्हती . केतकीने त्या अपघातानंतर 
डोळेच उघडले नाही ... 

       केतकी आम्हाला सोडून गेल्याचे दुःख फार काळ बोचत राहिले .  

नियतीने क्षणात  आम्हाला कसे दूर लोटले !  आजही वाटतं तिचा हात माझ्या हातात क्षणभरापूर्वीच तर होता .

एक अवकाशातून आम्हाला दुरवणारी विद्युत शक्ती खूप वेगात आली आणि तिचा हात माझ्या हातातून सोडवून घेतला . मी  कितीतरी दिवस सँडीला सांगत आली ,

" अगं केतकी माझ्याच सोबत होती . हा माझा हात तिच्या हातात होता सर्व मुले पळाली आणि आम्ही दोघी हेलिकॉप्टर किती जवळून जात आहे म्हणून उत्सुकतेने बघत होतो , ते आमच्या एवढ्या जवळ येईल अस वाटलंच नाही . केतकीचा हात माझ्या हातातून हताशपणे निसटला आणि ती माझ्यापासून दूर लोटल्या गेली कायमची दूर गेली ती "

  ... पहाटे झोपेतून उठून एखाद्या भयानक स्वप्नाने जाग यावी आणि चर्रर्र घाम फुटावा केतकी आमच्यात नाही ह्या विचाराने . साखरझोपही त्या दिवसानंतर कधी  आली नाही मला ....