क्रिष्णा आणि झपाटलेल रिसॉर्ट भाग-३

  • 10.3k
  • 5.9k

धाडस आणि मूर्खपणा यात खूप थोडा फरक असतो.......एवढ्या रात्री जंगलात जायचा निर्णय तर मंगेश ने घेतला होता....त्याचा दृष्टीने तो खूप मोठ धाडस करत होता.....पण तो धाडस नव्हे तर मूर्खपणा करत होता...... चालत चालत एकदाचा तो त्या साइट वर पोहचला.....जिथे दिवसा कामाची धावपळ असायची.....आता मात्र सर्वत्र शांतता पसरली होती.......ऐकू येणारी शांतता....आणि होता फक्त अंधार.....कुट्ट अंधार......मंगेशने खिशातून छोटी टॉर्च बाहेर काढली......त्या टॉर्चचा मंद प्रकाशात तो एक एक पाऊल पुढे टाकू लागला.......आणि जाऊ लागला जंगलाकडे......रिमझिम पाउस अजूनही चालू होता.......अचानक वातावरणाने आपल रूप बदललं.....आणि कमालीची थंडी वाढली......वार्यामने थोडा वेग वाढवला......त्यामुळे गारवा आणखी वाढला....पण हा गारवा भयानक होता.....मंगेश चा मनात आता मात्र थोड्याशा भीतीने