जत्रा - एक भयकथा - भाग ३

(14)
  • 14.4k
  • 1
  • 9.9k

तो एका झोपडीत होता . झोपडी यासाठीच म्हणायचं कारण ती लाकडाची होती पण एकदम आलिशान होती . तो एका लाकडी पलंगावर खोलीच्या एका बाजूला होता . त्याला लागूनच एक लाकडी कपाट होतं, त्याच्यावर अतिसुंदर वर्तुळाकार आरसा होता. त्यावरून खोलीतील दिव्याचा प्रकाश परावर्तित होऊन खोलीभर पसरला होता . खोली सुंदर सजवली होती . “ आयला रम्या आपल्या काटेवाडीच्या जंगलात असला बंगला हाय ते आपल्याला कसे माहीत नव्हते रे “ गण्या शुद्धीवर येत म्हणाला. आम्हाला तर कुठे माहीत होतं तेवढ्यात समोरचं दार कुरकुरीत उघडू लागलं . तिघेही प्रतिक्षिप्त क्रिये मुळे भलतेच जास्त सावध होत आक्रमक पवित्र्यात आले. “ अरे घाबरू नका मीच