क्रिष्णा आणि झपाटलेल रिसॉर्ट भाग-६

  • 7k
  • 3.2k

पावसाची सर अजूनही चालूच होती....सगळीकडे चिखल झाला होता....आतापर्यंत घडलेल्या घटणांमुळे त्या रिसॉर्ट चा जवळ ही जायला कोणी तयार नव्हतं.....पण मजबूरी म्हणून दोन सेक्युर्टी गार्ड तिथे उभे होते.......अंगावर रेनकोट हातात टॉर्च आणि दुसर्‍या हातात काठी......वातावरणात एक वेगळाच गारवा पसरला होता.....रिसॉर्ट पूर्ण सामसुम पडलं होत.....होत होता तो फक्त पावसाचा थेंबाचा आवाज...... कोणीतरी दुरून जंगलातून रिसॉर्ट कडे चालत येत होत......त्या चिखलातून वाट काढत तो चालत येत होता......चालत....?? चालत नव्हे लंगडत......कारण त्याचा एका पायाचा पंजा नव्हताच.......एका हातात जाडजूड काठी होती.....तीच तो चिखलात रोवून दुसर्‍या पायाने उडी मारून चालत होता........पायात साधी चप्पल ही नव्हती......अंगावर मळलेला धोतर तेही कमरे पासून गुढग्या पर्यन्त......थंडिपासून बचावासाठी अंगावर एक