आज मी तिला, साधारण तीस एक वर्षांनी भेटणार आहे. आज मात्र मी माझी बाजू मांडणार आहे. त्या काळी प्रेम करणं महापातक होत. आणि घरच्यांच्या नाराजीवर आम्हाला आमचा 'सुखी' संसार थाटायचा नव्हता. तिनें तिच्या घरच्याना राजी केले. पण मीच कमी पडलो! आम्ही शेवटचं भेटलो, तेव्हा 'जमेलसे वाटत नाही' असे मी सांगितले, तेव्हा जाम अपसेट होऊन, डोळे पुसत निघून गेली होती. माझी बाजू ऐकून न घेताच ती गेली होती. मी काय करायचे ठरवले आहे, हे तिला सांगणार होतो! त्यांनतर दिसलीच नाही! ती आज भेटतेय! तीस वर्षांनी! त्या वेळी आजच्या सारखे मोबाईल असते तर -----------