मंचकमहात्म्य -शेजार आणि प्रेम !

  • 6.1k
  • 1.5k

मंचकराव घराबाहेर, आपल्या मिशीच्या टोकाला वाती सारखा पीळ देत बसले होते. तेव्हड्यात त्यांचे शेजारी भुजंगराव आले. शेजारी भाडेकरू असेल तर, तो बदलून नवा शेजार येऊ शकतो, पण जर स्वतःहचे घर बांधून रहात असेल तर, तो मधुमेहा सारखा आयुष्याला चिटकलेला असतो. मरणा शिवाय सुटका नाही, त्याच्या किंवा आपल्या! हा भुजंग त्यातलाच. "काय मंचक, निवांत बसलाय."न मागता मिळालेला वैताग म्हणजे 'भुजंगराव', असे मंचकरावांचे व्यक्तिगत मत होते. म्हणून ते भुजंगरावांच्या माघारी त्यांचा उल्लेख 'भुक्कड भुजंग' असा करीत. " आमचे नाव मंचकराव आहे.!" जमिनीवरच्या आपल्या कोल्हापुरी खेटरा कडे पहात, आपल्या उजव्या मिशीवरून, डावी पालथी मूठ फिरवत मंचकराव खर्जात म्हणाले. भुजंगाला आपली चूक कळाली. या मंचकला एकेरी संबोधले