डिनर !

  • 5.4k
  • 1
  • 1.9k

गाडी चालवता चालवता त्याने डॅश बॉर्डरवरल्या घड्याळावर नजर टाकली. रात्रीचे अकरा वाजून काही मिनिटे झाली होती. डोक्यात नुकत्याच झालेल्या पार्टीची धुंदी होती. पण तो परफेक्ट कंट्रोल मध्ये होता. रस्ता निर्मनुष्यच होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या दिव्यांची निमुळती होत जाणारी रांग आणि त्यातला तो रस्ता, एखाद्या स्वप्नातल्या दृष्या सारखा मोहक दिसत होता. त्याने ए सी बंद करून ड्राइव्हर साइड्ची विंडो उघडली. गार वाऱ्याचे हलके मोरपीस चेहऱ्यवर झेलत, आवडती ट्यून ऐकत गाडी चालवणे त्याचा परमोच्य आनंद होता आणि तो, तो मनसोक्त उपभोगत होता. स्पिडो मीटरचा काटा शंभराच्या जवळपास तरथरत होता. समोरच्या कोपऱ्यावर कोणीतरी रस्त्याच्या मधोमध उभाराहून लिफ्ट साठी अंगठा दाखवत होते. खूप अर्जन्सी