फार्महाउस - भाग ८

  • 11.5k
  • 1
  • 6.5k

तिच्या मधुर आवाजात ऐकत असताना त्याच्या समोर सारे शब्द दृश्यात रूपांतरित होत होते . शैला बोलत होती -    " आता तू म्हणशील कि मला हे सारं कसं कळलं वगैरे ....?  तर ऐक , मीही एक प्रतिनिधीच आहे .  तुझ्या सारखी .  आपलं एकच काम आहे ते म्हणजे त्यांचा विनाश . ज्या दृष्ट आणि पाशवी शक्तींबरोबर आपला संघर्ष चालू आहे त्यांच्यासोबत एकटा-दुकटा लढू शकत नाही .  आपल्यासारखे अजूनही असतील त्यांचा ही त्या शक्तींविरुद्ध लढा चालू असेल . ज्याला-त्याला , ज्याच्या-त्याच्या कामगिरी वाटून दिल्या आहेत . आतापर्यंत तु तुझी कामगिरी करत होता ; मी माझी कामगिरी करत होते . आता आपल्याला