३३. महाराष्ट्रातील किल्ले- ८ ८. तोरणा किल्ला- तोरणा हा सह्याद्री पर्वतरांगांमधील प्रसिद्ध डोंगरी किल्ला आहे. आणि पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच डोंगर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला सर्वप्रथम जिंकून आपल्या स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली होती. तोरणा किल्ला प्रचंडगड म्हणून सुद्धा ओळखला जातो. तोरणा किल्ला पुणे जिल्ह्यातला दुर्गकोटातील अतिदुर्गम आणि अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या पर्वत रांगेतून दोन बाजू निघून पूर्वेला पसरलेल्या आहेत. त्या पैकी एका बाजूला तोरणा किल्ला आणि राजगड हे किल्ले आहेत. दुसऱ्या बाजूला भुलेश्वर रांग असे म्हणले जाते. तोरणा किल्ला पुण्यापासून अगदीच जवळ आहे. म्हणजे पुण्यापासून रस्त्याच्या वाटेने तोरण्यापर्यंतचे अंतर ६० किमी आहे. ह्या किल्ल्याला ऐतिहासिक महत्व लाभलेले