बहिर्जी नाईक आणि सुरतेची लूट - भाग १

(13)
  • 86.8k
  • 3
  • 25.3k

श्रावणाच्या सरी कोसळत होत्या...शेतीची कामे करायला बळीराजा नव्या जोमाने तयारी करत होता...राजगडाला सह्याद्रीच्या राक्षसी पावसाचा आणि भन्नाट वाऱ्याचा अभिषेक सुरु झाला होता...गेली चार वर्षे शाहिस्तेखानाने स्वराज्याला पिळवटून टाकले होते...त्यातुन स्वराज्य आत्ताच कुठे सावरले होते... पण आपला राजा सर्व काही ठीक करतील यावर जनतेचा विश्वास होता...सर्व काही निवांत होते...निसर्गाने कृपा केली होती पाऊस हात देत होता. पण राजगडाच्या पद्मावती मंदिरात राजे अस्वस्थपणे येरझारा घालत होते....स्वराज्य शांत असले तरी राजांच्या मनाला शांतता नव्हती...स्वराज्य उभे राहत होते नाही ते धावते करायचे होते... स्वराज्याला मलमपट्टी करायची होती..अनेक उध्वस्त संसार नव्याने मांडायचे होते....पण कसे करणार