श्री व्यंकटेशस्तोत्र, कृपाप्रसाद आणि मी!

  • 9.4k
  • 1.7k

श्री व्यंकटेश स्तोत्र(मराठी ) माझ्या नित्यातलेच. रोज वाचून वाचून ते आता मुखोदगत झालाय. कोणी तरी सांगितले कि स्तोत्र थोडे मोठ्याने आणि जप मनात करावा. स्तोत्र मोठ्याने म्हटल्याने घरातली 'नकारत्मकता' कमी होते. म्हणून मग मी जरा मोठ्याने म्हणू लागलो. तर त्यात एक सुंदर लय आणि गती गवसली. म्हणताना आनंदी समाधान मिळू लागले. बहुदा हि किमया सगळ्याच स्तोत्रात असावी. या स्तोत्राची मांडणी (किंवा बांधणी म्हणा )खूप सुंदर आहे. श्री गणेशादिंची वंदना झाली कि, व्यंकटशाची नामावली येते, बहुदा एकशे आठ असावीत, मी कधी मोजली नाहीत. या नामावलीच्या शेवटी 'वैकुंठ निवासीय निरुपमा, भक्त कैवारीया गुण धामा, पाव आम्हा ये समयी' अशी प्रार्थना केल्या बरोबर,