गण्याचं हॉस्पिटल रुपी गॅरेज

  • 6.4k
  • 2.6k

गण्याचं हॉस्पिटल रुपी गॅरेजगणेश साने नावाप्रमाणेच हुशार होता. त्याच नावच गणेश असल्याने तो सर्व व्यवसायात पारंगत होता. त्याच्या वडिलांची इच्छा होती की गण्यानं मेडिकलला जाऊन गावात स्वतःचे हॉस्पिटल सुरू कराव. जनसामान्यांची सेवा करून समाज ऋणातून मुक्त व्हावं. आपल्या ज्ञानाचा उपयोग सर्वार्थाने पीडित लोकांसाठी करावा. गण्याची देखील तीच इच्छा होती. त्यासाठी तर त्यांन तालुक्याच्या गावाला जाऊन एका मोठ्या कॉलेजात प्रवेश घेतला. त्यांन प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण नशिबानं त्याला साथ दिली नाही. मेडिकलच काय जमना म्हटल्यावर त्यांन त्याचा नाद सोडला. त्याच मन राहून राहून त्याला त्याची बोचणी देत होत. गण्या पण काय कमी न्हवत. त्यांन माणसाचं डॉकटर व्हायला जमत न्हाय अस दिसल्यावर