'जिंदगीमे क्या खाना तो -दम -खाना, और क्या करना तो -आराम -करना' हे नागूचे लाडके तत्व. कामाचा प्रचंड कंटाळा. खाऊन झोपणे. झोपेतून उठून पुन्हा खाणे. याच साठी तो जन्माला होता! नाग्या म्हणजे साक्षात आळस ! पण यालाही एक कारण होते. नागूच्या घराण्याचा मूळ पुरुष खूप कर्तबगार होता. त्याच्या शौर्यावर खुश होऊन, कोण्या तरी राजाने त्याला पाच गावे ईनाम दिली होती. त्या मूळ पुरुषाने इतकी कर्तबगारी दाखवली कि, 'कर्तबगारीचा ' सगळा कोटा एकाच फटक्यात संपवून टाकला! मग नाईलाजाने, नन्तरच्या पिढ्यानी 'बसून खाल्ले '. ते हि काही पिढ्या चालून गेले. नव्या पिढ्या अधिक चतुर निपजल्या, त्यांनी 'विकून खायला' सुरवात केली! नागूच्या वडिलांनी नागूच्या 'रोटी