पापी !

  • 5.8k
  • 2k

भारताच्या निकोबार बेटा पासून, पूर्वेस दूर हे काळू बेट आहे. हे इतके लहान आणि नगण्य आहे कि जगाच्या भुगोलांच्या पुस्तकांनी आणि नकाशांनी याची दाखल सुद्धा घेतलेली नव्हती! सॅटेलाईटच्या उजेडात हे जगाच्या नकाशावर आत्ताअवतरले आहे! भारतीय आणि चीनी लोक मात्र ' अक्षय तारुण्य ' देणाऱ्या वनस्पतीच्या शोधात येथे यायचे! आणि अश्याच काही भारतीय लोकांना घेवून हि समशेरची ' रुद्रा ' नामक बोट, काळू बेटावर चार दिवसा खाली आली होती. आज संध्याकाळी 'रुद्रा ' परतीच्या प्रवासाला निघणार होती.