पासिंग मुंबई!

  • 5.2k
  • 2.3k

फायर प्लेस समोर बसून मामाने ड्रिंक्सचा एक लार्ज पेग भरला. तो तोंडाला लावणार तेव्हड्यात फोन वाजला.अननोन नंबर. "मामा,एक डील आहे."" हा.बोला.""बल्क, पण महत्वाचे ट्रान्स्पोरट!""डेस्टिनेशन?""कोकणच्या एका वळचणीच्या सागर किनाऱ्या वरून.""डिलेव्हरी?""मुंबई पास करून द्यायची. दिल्लीचा पाशा पुढे घेवून जाणार.""म्हणजे कोकण ते पाशा पर्यंत पोहंचवण्याची डील?""हो.""साईझ?""पाच बाय तीन बाय दोनचे, पन्नास ते साठ किलो वजनाचे क्रेट! नग चाळीस!""आत काय आहे? हे विचारणार नाही. माझ्या आटी. एक माझ्या पद्धतीने काम करीन. दोन, पाशाला पझेशन दिले कि माझा समध संपला. स्टॉक बल्की आहे. रिस्क वाढते. डील तीन कोटीची!""मामा जास्त ---""काय हमाल समजलास?. मामा जास्त बोलत नाही आणि ज्यास्त बोललेलं मामाला आवडत हि नाही! तेव्हा बाय!" मामा