फरिश्ता !

  • 5.3k
  • 3k

रात्रभर ड्रायव्हिंग करून थकलेल्या रहिमने आपली टॅक्सी नेहमीच्या जागी पार्क केली. तिच्या महा.xx/०७८६ या नंबर प्लेटच्या खाली बारीक अक्षरातीत 'फरिश्ता' या शब्दा कडे पाहून तो समाधानाने हसला. आता रात्री नउ साडेनऊ पर्यंत निवांत होते. रहिम रात्रीच टॅक्सी चालवत असें. आज पुन्हा 'पाव भाजी'वरच भागवावे लागणार होते.तो दगडूदादाच्या गाड्याजवळच्या बाकड्यावर विसावला. "दगडूदादा, एक पाव भाजी दे दे .""क्या रहीम, आज पुन्हा पाव भाजी?" दगडूने गरम तव्यावर भाजी साठी बटरचा गोळा सोडत विचारले. "हा,दादा,आज फार आमदनी कमतीच हुवा!""फिर कमीच?आबे,पण असं रोजरोज पावावर भागवून कस जमेल?मरशील उपाशी!"दादा रागावला पण त्याच्या रागावण्यात माया होती. "अरे,नहीं दादा. पैसा है. कम-ज्यादा चालते रहेगा.दो दिन कमी तो चार दिन ज्यास्ती मिलेगा. पर ये दो