प्लीज, येऊ दे ना !

  • 4.6k
  • 2.2k

बाहेरच चमकदार निळसर आकाश, त्या खाली नुकताच पिंजलेल्या कापसासारखे पांढरे शुभ्र ढग, सुनीलला विमानाच्या खिडकीतून दिसत होते. खिडकीशेजारचा विमानाचा पंखा, त्या मावळतीच्या सोनेरी सूर्य प्रकाशात तळपत्या तलवारीच्या पात्या सारखा भासत होता. 'विरोध करणाऱ्याला कापून काढीन' असा त्याचा अविर्भाव होता. सध्यातरी तो पंखा विरळ हवेतुन जात होता. या उंचीवरून पृथ्वीची गोलाकार कड सुंदर अन रेखीव दिसत होती. त्याने घड्याळात पहिले. अजून बरोब्बर दहा तास आणि वीस मिनिटांनी, हे विमान मुंबई विमानतळावर लँड होणार होते. तब्ब्ल चार वर्षांनंतर तो माय देशाच्या मातीवर पाय ठेवणार होता! "राकेश, हे दहा तास कधी समपतात असं झालाय! आईला चार वर्षानंतर भेटणार आहे! तिने खूप कष्टाने माझे शिक्षण आणि सांभाळ