रामजी पांगेरा

  • 30.7k
  • 8.6k

रामजी पांगेरा मोगलांची टोळधाड स्वराज्यावर कधी चालून येईल याचा पत्ता नव्हता...आदिलशाह, निजाम राजांना घाबरून असत...सह्याद्री आणि राजांनी तसा वचकच बसवला होता...पण औरंगजेब मात्र शांत बसायला तयार नव्हता..काही करून त्याला स्वराज मातीत मिळवायचे होतेच...आतापर्यंत राजांनी सुरत दोनदा लुटली होती...साक्षात औरंगजेबाच्या पुढयात त्याचा वाढदिवसाला आणि तेही सर्व जगासमोर आवाज चढवून राजे सुखरूप राजगडी पोहोचते पण झाले होते..नखभर स्वराज्य पण ते औरंगजेबाच्या काळजात एका कट्यारीप्रमाणे खूपत होते...औरंगजेब एकाहून एक असे योद्धे पूर्ण ताकदीनिशी स्वराज्यावर पाठवत होता...दिलेरखान बऱ्हाणपुराहून सुस्साट सुटला होता...मिर्झाराजे जयसिँग त्यांची जागा त्याला घ्याची होती..औरंगजेब बादशाहासाठी तो काहीही करायला तयार होता.. हि खबर घेऊन हेर धावत पळत सुटले..