रामजी पांगेरा
मोगलांची टोळधाड स्वराज्यावर कधी चालून येईल याचा पत्ता नव्हता...आदिलशाह, निजाम राजांना घाबरून असत...सह्याद्री आणि राजांनी तसा वचकच बसवला होता...पण औरंगजेब मात्र शांत बसायला तयार नव्हता..काही करून त्याला स्वराज मातीत मिळवायचे होतेच...आतापर्यंत राजांनी सुरत दोनदा लुटली होती...साक्षात औरंगजेबाच्या पुढयात त्याचा वाढदिवसाला आणि तेही सर्व जगासमोर आवाज चढवून राजे सुखरूप राजगडी पोहोचते पण झाले होते..नखभर स्वराज्य पण ते औरंगजेबाच्या काळजात एका कट्यारीप्रमाणे खूपत होते...औरंगजेब एकाहून एक असे योद्धे पूर्ण ताकदीनिशी स्वराज्यावर पाठवत होता...दिलेरखान बऱ्हाणपुराहून सुस्साट सुटला होता...मिर्झाराजे जयसिँग त्यांची जागा त्याला घ्याची होती..औरंगजेब बादशाहासाठी तो काहीही करायला तयार होता.. हि खबर घेऊन हेर धावत पळत सुटले..
रामजी पांगेराला सांगावा आला...दिलेरखान कण्हेरी गडाच्या दिशेने येतोय कदाचित १ ते २ दिवसात तो ह्या कण्हेरी गडाचा घास घ्यायला पोहचेल ...त्यावेळी रामजी पांगेरा आपल्या १००० लोकांसह कण्हेरी गडाच्या पायथ्याशी तळ ठोकून होते होते...कण्हेरी गडावर जाऊन लढा देणे हा उत्तम पर्याय होता..खबर ऐकून रामजी पांगेराची तळपायांची आग मस्तकात गेली..दिलेरखानाने आणि मिर्झाराजे जयसिँग पुरंदर जिकंताना जे काही स्वराज्याचे हाल केले होते ते आता करून द्यायचे नव्हते..आता पाठी फिरणे रामजीला मान्य नव्हते .. रामजीने ठरवले इतेच भिडायचे..कापून काढू गनिमांना...आपल्यासह त्याने ७०० लोकांनां निवडले आणि ३०० लोक वर गडाच्या दिशेनं पाठवून दिले...गनीम हळूहळू जवळ येत होता... जवळ जवळ १०००० गनिमाचे बळ होते.... ७०० जणांना असे मारून टाकले असते..आपला १ आणि त्यांचे ३ असे प्रमाण होते...मृत्यू अटळ होता...
हळू हळू " अल्ला हो अकबर" च्या घोषणा ऐकायला येत होता...रामजी बेभान झाला...मस्तकावरची शीर तडाडली...दोन्ही बाहु फुलले..दोन्ही हातातल्या तरवारी गनिमाचे रक्त चाटायला वेड्या पिश्या झाल्या...ढाल तर केव्हाच फेकून दिली.. आता फक्त मारायचे दोन्ही हातांनी मारायचे...अंगावरची बाराबंदी...डोक्यावरचे पागोटे आता जागेवर नव्हते...अंगात शिवाचे भुते संचारले होते.. "अर या आमचा राजा हवाय ना तुम्हाला...या...या."..रामजी आता काळ्या भिन्न दगडासारखा भासत होते ..त्याची भरदार छाती खालीवर होत होती ...पार कानांच्या पाळ्यांपर्यंत आलेले भरदार कल्ले आता थरथर होते ... तो आपल्या मावळ्यांना बोलला.. " एक भी जित्ता जाता देऊ नका...आपल्या मातीवर हात टाकायला आलेते...मारा ...कापा"
आणि येवढयात समोर गनीम आला... ७०० मावळयांनी एकच एल्गार केला...हरहर महादेव हरहर महादेव चा घोष पार आभाळी भिडला...निधड्या छातीनिशी ते शिवाचे भुते तांडव करत गनिमाला जाऊन भिडले..विजेला हि लाजवेल असा तरवरींचा एकच कडकडाट झाला..पहिली गनिमांची तुकडी कधीच कापली गेली ...रामजी पांगेरा आता रामजी पांगेरा राहिला नव्हता...साक्षात शिवशंकर तांड्व करत होता...हातात तरवारी नव्हत्या...विजा होत्या विजा...गनीम कापला जात होता..३०० मावळे १०००० गनिमांना भिडत होते...मोगलांना सुद्धा येवढ्या कडव्या झुंजीची अपेक्षा केली नव्हती.. कोणाचे मुंडके कोणाचे हात तुटत होते... दिलेरखान पुरता चवताळला होता...येवढा मोठा सेनानी औरंगजेब बादशाहाचा सेनानी...कित्येक झुकले होते त्याचा पुढ्यात... पण हि शिवाची भुते त्याला ऐकत नव्हती...लढून काय मिळणार होते त्यानां...जहागिरी.. खिल्लत... जमीन जुमला... नाही नाही काही नाही... फक्त अन फक्त आपल्या राजासाठी आणि स्वराज्यासाठी लढत होते..
खुप मावळे पण कामी आले होते...पण कोणीच मागे हटायला तयार नव्हते...फक्त एक मोगली मनसुब्याचीपावले इथे स्वराज्यात पडू द्यायची नव्हती...रामजी पांगेरा आता लालेलाल झाला होता...तोच काय बाकीचे मावळे पण लालबुंद झाले होते...अंगावर एक हि जागा राहिली नव्हती जिथून रक्त उसळत नव्हते...नुसता हलकल्लोळ उडाला होता...दिलेरखान फक्त पाहत राहिला होता असा कडवा संघर्ष त्याने कधी पाहिला नव्हता...गनीम कापला जात होता ...कोणालाच शुद्ध राहिली नव्हती...घोषणा पार आभाळाला भिडत होत्या...शेवटी अजून संघर्ष कडवा होता गेला...आणि दिलेरखानाचा झेंडा पडला आणि नाईलाजाने दिलेरखानाला माघार घ्यावी लागली...शिवाच्या भुतांपुढे गनीमाने हात टेकले होते...
आणि मराठ्यांनी एकच जयघोष केला
हर हर महादेव....जय भवानी...जय शिवाजी