HAKUNA MATATA books and stories free download online pdf in Marathi

हकुना मटाटा

"हकुना मटाटा"


तो एक ओंगळवाणा,कुरुप राक्षस असतो...पण क्रूर नसतो...एका गावात मानवी वस्तीपासून आपल्याच विश्वात मग्न असतो...पण काही कारणांमुळे त्याला स्वतःचे गाव सोडावे लागते...आणि तो पुढे प्रवासाला निघतो...आणि काही कारणांमुळे एक सुंदर राजकुमारीला सुखरूप सोडवून राजवाडयात सोडण्याची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडते... पुढे प्रवासात राजकुमारीला कळते .. हा फक्त दिसायला कुरुप आहे मात्र मनाने एक राजहंस आहे...ती त्याचा प्रेमात पडते..इथे हा राक्षसही हळूहळू तिच्यावर भाळतो ..इतक्या आपुलकीने त्याच्या बरोबर कुणीही वागलेलं नसते...एक रात्री ते एके ठिकाणी मुक्कामाला थांबतात..आणि सकाळी पुढे निघणार..तेव्हा त्या राजकुमारीचे रूपांतर एका राक्षसी मध्ये झाले असते...तेव्हा ती राजकुमारी त्याला आपल्या शापाबद्दल त्याला सांगते..त्यालाही बरे वाटते ...आपल्याला आल्यासारखा कोणीतरी साथीदार भेटला..पण त्याला असेही जाणवते ती राजकुमारी आहे आणि आपण ओंगळवाणा,कुरुप राक्षस...मग दोघेही आपल्या घरी जातात..पण दोघांनाही करमत नसते...मग पुन्हा तो राक्षस राजकुमारीला भेंटण्यासाठी निघतो..आणि काही करून आपण तिला मिळवायचे असे ठरवतो..आपण स्वतः बदलायचे..फक्त तिला सुखी करायचे.. आणि योगायोगाने त्याला एक जादूगार भेटतो आणि तो त्याचे रूपांतर एका राजबिंडया पुरुषात करतो आणि असेही सांगतो येत्या २४ तासात जर का तु त्या राजकुमारीचे चुंबन घेतलेस तर..तुम्ही दोघेही पुढे आयुष्यभर ह्याच रूपात राहाल...शेवटी ती वेळ येऊन ठेपते फक्त एक चुंबन आणि दोघांचे पूर्ण जग बदलणार असते..पण राजकुमारी चक्क नकार देते त्या गोष्टीला... ती बोलते " तू जसा आहेस तसाच मला हवा आहेस..बाकी काही नको ''... राजकुमारी त्या राजवाड्याच्या स्वर्ग सुखाला नकार देते...आणि आपल्यावर आपल्यापेक्षाही प्रेम करणाऱ्या राक्षसाबरोबर राहते.. आणि शेवटी एक संदेश येतो

"IMPERFECT PEOPLE CAN STILL HAVE THEIR OWN HAPPY ENDINGS"

संदर्भ ( shrek - DreamWorks Pictures )


त्या राजकुमारीने त्याचे बाह्यरूप नाही पहिले...त्या ओंगळवाणा चेहऱ्यामागे असलेलं एक राजहंसी मन पाहिले.. त्याच्या गुण-अवगुणा सकट त्याला स्वीकारले...आणखी कितीतरी अश्या कथा आहेत सिनेमे आहेत ( आपल्या इथले बॉलिवूड किंवा मराठी नाहीत ( काही अपवाद)...वॉल्ट डिस्नी किंवा पिक्सल यांचे ऍनिमेशन चित्रपट)...प्रत्येक ऍनिमेशन चित्रपटांत असे काही ना काही प्रेरणादायी संदेश असतात... एकदा नीट निरखून बघाच..खास करूंन वॉल्ट डिस्नी यांचे ऍनिमेशन चित्रपट..त्यात असलेली सर्व पात्रे अगदी साधी सुधी असतात..आपल्यासारखी पिचलेली असतात..पण ती थांबत नाहीत आपले उद्दिष्ट मिळवण्यासाठी धावतच असतात..एकमेकांना अगदी आहेत तसेच स्वीकारतात....अश्या चित्रपटात कधीच बाह्यरूपाला महत्व नाही देत...आपले मित्र कुटुंब ..आपल्यात असलेले सुप्त गुण या गोष्टींनाच खुप महत्व असते आणि म्हणूनच मला हे चित्रपट आवडतात.. एकदम साध्या सोप्प्या शब्दात कोणतेही उपदेशाचे डोस नसतात..इतके ते जग सुंदर असते..."

lion king चे उदाहरण घ्या...काय शिकवण आहे त्यात..आपल्या भूतकाळापासून कधीच पळू नका..त्याला सामोरे जा तरच तुम्ही यशस्वी व्हाल..काहीतरी भूतकाळापासून शिका आणि त्यातले ते गाणे hakuna matata अर्थ जास्त टेन्शन घेऊ नका किंवा Tangled कधी कधी आपण आपल्या विणलेल्या कोषात राहतो..पण एकदा बाहेर पडून बघा एक नवे जग तुमचे स्वागत करण्यासाठी उभे असेल....सुरवंटाचे पहा ना काय होते जेव्हा तो कोषातून बाहेर पडतो ?? किंवा Up...एक हट्टी म्हातारा..आपल्या मेलेल्या बायकोचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय आटापिटा करतो ते बघाच एकदा किंवा Brother Bear एखादयाला पूर्णपणे समजण्यासाठी त्याच्या बरोबर थोडे चाला किंवा Mulan पहा एक स्त्री काय काय करू शकते ते समजेलच किंवा Beauty and the Beast आपली सुंदरता कधीच आपल्या बाह्यरूपावर अवलंबून नसते.. मात्र आपण इतरांना कसे वागवतो त्यावर नक्कीच अवलंबून असते किंवा Wreck-It Ralph ह्या जगात उत्तम कोणीच नसते पण तुम्ही जसे आहात तसे स्वतः मान्य करतात तिच उत्तम गोष्ट आहे किंवा Alice in Wonderland ह्या आपल्या आसपासच्या जगात कितीही वाईट गोष्टी होऊ देत पण तुम्हाला स्वतःचे एक सुंदर जग निर्माण करता येईल.

हे चित्रपट खूप काही शिकवुन जातात आपल्याला एकदम साध्या शब्दात मोठ्या गोष्टी सांगून जातात...सामान्य माणसाला सुपरहिरो बनवतात...स्वतःला ओळखायला शिकवतात...म्हणून आपले कच्चे-बच्चे असे काही चित्रपट पाहत असतील तर आपण पण नक्की पहा..न जाणे काहीतरी शिकायला मिळेल त्यातून... तो पर्यंत "हकुना मटाटा"

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED