आमचा रायगड पाऊसातला MILIND KALPANA RAJARAM DHANAWADE द्वारा प्रवास विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

आमचा रायगड पाऊसातला

"आमचा रायगड पाऊसातला "

दिनांक : २९.०७. २०१२...एक पावसाळी रविवार... हा आमचा १६ ट्रेंक्क होता ...त्यापैकी फक्त कर्नाळा पावसातून केला होता..एकूण २. ३० ते ३. ०० तास चढाई होणारा हा पहिलाच ट्रेंक्क होता.. थांबा त्या आधी ट्रेकक मेंबर ची नवे सांगतो मी, भिवाजी , अमित , प्रसाद, शशिकांत ( LIC ), राकेश आणि प्रशांत , गणेश (दोघांचा हि पहिला ट्रेकक).

एक आठवडा अगोदर सर्वाना ट्रेकक ची यादी पाठवून झाली होती..ठरल्याप्रमाणे आम्ही तिघे मी, प्रसाद,राकेश एल्फिस्टन स्टेशनला ला बरोबर १० ची गाडी पकडणार होतो बोरिवलीसाठी ...पण राकेश उगवला स्टेशनवर बरोबर रात्री ११ वाजता...ते पण अंगावरचे एक जोडी कपडे आणि फक्त ६ केळी आणि मोबाईलची २५ % असलेली बॅटरी घेऊन ....जसा काय आता आम्ही ३ केली घेऊन पूजेला जाणार होतो..काय करणार ? आणि काय बोलणार ? त्याची आधीच्या ट्रेककची पुण्याई लक्षात घेऊन आम्ही गप्प राहिलो.. ( हनीमून च्या दिवशी सकाळी ट्रेकक फक्त शब्द दिला म्हणुन आणि रात्री ८ वाजता हनीमून ला प्रयाण) असे करणारं ते असेच एक खास व्यक्तिमत्तव होते आमच्यात.

शेवटी बोरिवली ला पोचायला आणि आम्ही ठरवलेली गाडी शोधायला १२. ३० वाजले..त्यात राकेश चा हट्ट मीच पुढे बसणार...बस बाबा बस..
सगळे जमेपर्यंत १ वाजला...मग सामान टाकता टाकता सर्वानी अगदी मोक्याच्या जागा अडवल्या..शेवटी मी , भिवाजी, प्रसाद आणि गणेश सामना सकट पाठी अड्जस्ट झालो. त्यात शशिकांत ( LIC ) आम्हाला रात्री १. ३० ते ६. ०० वाजेपर्यंत अपघात झाल्यावर LIC काय रिटर्न्स देते ते समजावत होता. दरमजल करत आम्हीं रायगडच्या पायथ्याशी ६. १५ ला पोचलो ..आम्हाला आधी वाटले आम्हीच पहिले असू...पण बघतो तर काय तिथे जत्रा भरली होती....पाऊस रिपरिप करत होता ..धुके काय असते ते आम्ही तिथे पहिले.. रायगडच्या पायथ्याशी गर्दी बघून..सरळसोट पायरांच्या मार्गे न जाता " नाना दरवाजा" ( लहान दरवाजा ) ने जाऊ असे आम्ही ठरवले ....तेव्हा आम्ही रायगडच्या पायथ्याशी डाव्या हाताला जी वाट खाली जाते..ते पकडली..आणि खाली खाली उतरत आलो .. मग कळले कि आम्ही चुकलो..रस्ता सांगणारे सुद्धा कोणी नव्हतं तिथे... फक्त आम्ही ८ जण...मग एका ठिकाणी एक पायवाट दिसली मी पुढे जाऊन पहिले..तर एक धबधबा कोसळत होता..मग काय तिथेच सर्व काही उरकुन टाकले...सार्वजनिक आंघोळ ह्या त्याला एक प्रकार फक्त आम्ही ८ जण असल्यामुळे काही कोणाची भीती नव्हती.. आणि त्यातही आंघोळ करता करता शशिकांत ने राकेश ला पटकन २ LIC Policy समजावल्या.... आणि तिथली गर्द झाडी बघून आम्ही बॅटिंग करुन मोकळे झालो आणि दुप्पट जोमाने रायगड स्वारीसाठी मोकळे झालो .

खालुन गावाकडून येणाऱ्या आजोबांनी आम्हाला " नाना दरवाजा" ची वाट दाखवली...आता पावसाने चांगलाच जोर धरला होता आमच्या बॅगेत.. कपडत्यात .. सुख्या खाउत ..बुटांत .. आसपास सगळीकडे पाऊस भरून राहिला होता ... त्याला राजांना आणि रायगडाला अभिषेक करायचा होता ना... आणि धुक्यामुळे वाढणारी थंडी...हिरवीगार पायवाट.. भन्नाट वारा...त्यावर डोलणारे शेत.. झाडं ... आणि त्यात आम्ही.. अदमासे ३० ते ४० मिनिटं चढल्यावर " नाना दरवाजा" आला..तिथल्या गर्द झाडीमुळे तो लांबून दिसत नाही..तिथुन पुढे कसे जावे ते आम्हाला पण समजेना एक तर पाऊस आणि धुक्यामुळे समोरचे काहीच दिसत नव्हते...त्यात प्रशांत तिथे दिसला साप आणि आमची जाम तंतरली..आणि थोड्या वेळाने राकेश बेंबी च्या देठापासून ओरडत सुटला...साप साप माझा पाय... आम्हाला वाटले चावला कि काय..आमचा आरडा ओरडा ऐकून वाट चुकलेले अजून चार जण तिथे धावत आले .नंतर बघितले तेव्हा कळले ..त्याचा तुटलेल्या चपलेचा पट्टा त्याला लागत होता...

ते ४ जण आणि आम्ही ८ जण ...कोणालाच कळेना कुठे जावे ते... त्यात शशिकांत त्या ४ जणांवर impression टाकायला त्यांना थांब थांब करेपर्यंत भलंत्याच वाटेने घेऊन गेला...पावसात कुठे काही दिसेना कुठे काही ऐकू येईना...जवळ जवळ अर्धा तास चालल्यावर...समोर वाट खतम जवळ जवळ २५ ते ३० फुटांचा सरळसोट कडा उभा होता... आणि बघतो तर काय शशिकांत ला त्या ४ पैकी २ जणांनी खांदयावर घेऊन उभे होते..काय चालले होते देव जाणे तो कडा शशी ला चढायचा होता... का तर रस्ता शोधायला...त्यात भिवाजीला वाईट वाटले तो बोलला " आपण वाट चुकलो त्या ४ जणांवर impression खराब पडले आपले"... अरे कुठे ते परत भेटणार होते....दुपार होती कि संध्याकाळ काहीच समजत नव्हते...पाऊस आणि आभाळ तसेच भरले होते..काही मिनिटे खाली उतरलो आणि अंदाजे उजव्या हाताला चालत गेलो... आणि जोर्रात आवाज आला धडाम...मी सणकून आपटलो..कुठे ते विचारू नका...तो शरीराचा भाग दुखत होता पूर्ण ट्रेंक्कभर धड बसता येईना आणि चालत हि येईना..पण पुढल्या वंळणावर रस्ता सापडला आणि तिथून महादरवाजा हाकेच्या अंतरावर होता..ते बघून त्या ४ जणांनी आमच्या समोर साष्टांग नमस्कार घातला ( शप्पथ खोटं नाही बोलत.)

तेव्हापर्यत ११ वाजले होते... आणि रस्ता चुकल्यामळे आमचे १२...हळू हळू चढत आम्ही आधी शिरकाई देवीचे दर्शन घेतले..तिथून मग गंगासागर .. हत्तीसागर..राणी महाल...राजदरबार..बाजारपेठ...टकमक टोक.. जगदीश्वर मंदिर... सर्व अधाशासारखे पाहून घेतले... जगदीश्वर मंदिर ला जी वाट जाते तिचे मोठ मोठे लोखंडाचे ( विजेचे खांब ) जमीनीला टेकलेले पहिले...तेव्हा एका ट्रेककरने सांगितले रायगडी पावसाचा प्रताप होता तो...आता जवळ जवळ १ वाजला होता...भूक लागली होती.. एकदम सडकून.. मग ओल्या अंगाने... पुन्हा बाजारपेठेच्या पाठी जाऊन ओल्या अंगाने...चुलीच्या उजेडात... लाकडावर भाजलेली गरम गरम भाकर आणि पिठले ..लसणीची चटणी...पावसासकट आम्ही खाऊन टाकली...खाली येताना पाय लटपटत होते...पाऊस आणि धुके काही कमी नव्हते.. शेवटी शहाणपणा केला आणि रोपवे ने खाली आलो...खाली येताना वर उजव्या डाव्या कानातून आरपार होत होता... नंतर काही दिवस अजून कान सुन्न होते..

निघेपर्यंत ४ वाजले होते.. आणि पाऊस संपून मस्त कोवळं ऊन आले होते...सुमारे ७ वाजता कुठेतरी आमच्या गाडीने धोका दिला..सर्व खाली उतरलो.. काळोखात बसून होतो...नशीब तिंथल्या एका जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हरने काहीतरी करून गाडी चालू करून दिली...कसेतरी त्या गाडीने आम्ही पनवेल गाठले... आणि ST किंवा ट्रेन पकडून रात्री १ ते २ वाजता घरी पोहचलो आणि पाऊस आणि रायगडला उशाशी घेऊन घोरू लागलो.


टीप : ह्या ट्रेंक्कला सुद्धा अमित पडला ....

आणि ट्रेंक्कचे फोटे पाहण्यासाठी खालील लिंक कॉपी पेस्ट करा आणि फेसबुक लॉग इन करा ...

https://www.facebook.com/milind.dhanawade.5/media_set?set=a.401257469933316.92065.100001472007532&type=3


किंवा माझ्या फेसबुक भितींवर "आमचा रायगड पाऊसातला " हा अल्बम शोधा