MALHARGAD SASWAD PUNE books and stories free download online pdf in Marathi

मल्हारगड सासवड पुणे


"मल्हारगड-(सासवड-पुणे)"

घरच्या जबाबदाऱ्या...आमच्या पिल्लासांठी दिलेला वेळ... यात आम्हाला आमच्यासाठी वेळच देता आलं नाही...शेवटी प्रसाद च्या पुणे ट्रान्सफर चे निम्मित झाले आणि मग ठरले पुण्याला ट्रेकक करू...शेवटचा ट्रेकक जानेवारी १७ ला केला होता आणि आता फेब्रुवारी १८ ला ट्रेकक करत होतो...वर्षभराच्या काळात पोटावर टायर पण जमा झाले होते...म्हूणन त्यातला त्यात सर्वात सोपा किल्ला निवडला "मल्हारगड-(सासवड-पुणे)" ह्या किल्ल्याला सोनेरीचा किल्ला पण बोलतात...का ते फोटो बघून समजेल...

आम्ही पाच जण तयार झालो भिवाजी,रघुनाथ,अमित, प्रसाद फ्रॉम पुणे आणि मी आमची सुरवात झाली रेल्वेची तिकीट बुक करण्यापासून... शनिवारी रात्री ११ ची ठाणे स्टेशन वरून पुणे ला जाणारी रेल्वे पकडली ( कोईम्बतुर एक्सप्रेस)...ती पोचली तिथं बरोबर २ ते २.१५ ला ( लोकमान्य टिळक टर्मिनस -ठाणे-कल्याण-पुणे )...झाले ४ जण आम्ही मी, भिवाजी, अमित, रघुनाथ पुणे स्टेशन ला उतरलो...प्रसाद ५.३० वाजता गाडी घेऊन येणार होता आणि आता काय तेवढ्यात भिवाजी ने घोषणा केली स्टेशन वरचं ताणून देऊया ...आणि आम्ही काही बोलण्या आधी तो चक्क घोरायला लागला...बाकी आम्ही तिघे त्याला बोलत होतो..पुणे स्टेशन वरच जिथून लोणावळा साठी लोकल निघते त्या प्लॅटफॉर्म वरच काही वेळेसाठी रूम भाड्याने मिळतात अगदी माफक दरात किंवा स्टेशन च्या समोर जिथे रिक्षा स्टॅन्ड आहे तिथे एक धर्मशाळा पण आहे २ मिनिटांवर तिथे जाऊन आराम करू ....पण नको...अरे ह्यात टच ट्रेकिंग ची मजा असते...हेच रिपीट करत राहिला

मग काय झोप तर आलीच नाही...मात्र डासांनी मस्त साथ दिली आम्हाला...शेवटी ५ वाजता कंटाळून भिवाजी ला जबरदस्तीने उठवून काही पोटात ढकलायाला मिळते का ते पाहण्यासाठी स्टेशनच्या बाहेर आलो... पण तिथे पण २ ते ३ खाऊच्या गाड्यांशिवाय काही नव्हते...मेनू एकच कांदे पोहे आणि चहा.. मग जे काय होते ते ढकलले...शेवटी एकदाचा प्रसाद ५.३० ला गाडी घेऊन आला...गाडीत बसता बसता आम्ही पुन्हा भिवाजी च्या नावाचा उद्धार केला...

मग आम्ही ६ जण आम्ही पाच आणि १ गाडी मल्हारगड च्या दिशेने निघालो...बाहेर गुड्डूप अंधार...बोचणारी गोड थंडी...वळणावळणाचा रस्ता अर्धा ते पाऊण तासाने आम्ही पुणे-सासवड रस्त्यावरील दिवे घाट चढून वर आलो... दिवे नावाचे एक छोटेसे गाव लागते...तिथे हा एक छोटा फलक आहे...इथून गडाचा पायथा ३० मिनिटांच्या अंतरावर आहे

सकाळी जवळ जवळ आम्ही ६.३० ला मल्हारगडाच्या पायथ्याशी पोहचलो... आम्ही एकूण १० ( ५ जण आम्ही आमची १ कार आणि तिथे असलेले ४ कुत्रे) एवढेच आम्ही हजर होतो..आणि काही वेळात गडाच्या बुरुजावरून सूर्यदेव हळू हळू आपलं अस्तित्व जगाला दाखवून देत होते पण ते पाहायला अंथरूणात लोळत पडून नाही पाहता येत ... त्यासाठी डोंगर पालथे घालावे लागतात

हे सोनेरी गाव...गडाच्या पायथ्याशी टोमाटो आणि सिताफळाची शेत आहेत

डोंगर चढायला ३० ते ४५ मिनिटे पुरतात...वरती पाणी आणि खायची काही सोय नाही...एक बुरुज दिसतो तिथे ...तिथे चोर दरवाजा आहे

ह्या चोर दरवाजाने किल्ल्यात प्रवेश करता येतो ...आपण जे चढतोय ती किल्ल्याची पाठची बाजू

गडावर दोन विहिरी आहेत पण... त्यात पाणी नाही
मात्र काही दुर्गवेडयानंमुळे हा तलाव पुन्हां जिवंत झाला आहे
हे महादेवाचं आणि खंडोबाचं मंदिर
देवड्या इथेच मुख्य दरवाजा आहे
काय बोलणार फक्त बघावे आणि साठवून ठेवावे

काही फोन कॉल्स नाहीत... डेड लाईन नाहीत...घड्याळाची टिकटिक नाही.. कुठची हि ट्रेन पकडायची घाई नाही...गडबड नाही गोंधळ नाही....शांत फक्त शांत ...वेड लावणारी शांतता...हवी हवीशी शांतता...फक्त आम्ही ५ जणच गडावर होतो...मग काय अर्धा तास तसेच झोपलो...आणि त्या मल्हारीने पण मायेने आम्हाला थोपटले...काही गुज गोष्टी त्याने आम्हाला सांगितल्या... सूर्यदेव पण काही काळ ढगाआड गेले...मस्त वाटले...

आता ह्या फोटोंचे काहीच नाही वाटत...पण जेव्हा आम्ही साठी गाठू तेव्हा हेच फोटो आमच्या सोबतीला असतील
ह्या गडावर राहण्यासारखे काही नाही...पाणी नाही...खाण्याची व्यवस्था अजिबात नाही...मानवी हस्तकक्षेपासून हा गड अजून तरी खूप लांब आहे...आणि बाकीचे छायाचित्र संगमेश्वर मंदिर सासवड चे आहे गडापासून अर्धा ते पाऊण तासाच्या अंतरावर आहे..

बाकी भेटू पुन्हा अजून एक मित्राला घेऊन...

ह्या किल्ल्याचे फोटो जरूर पहा माझ्या थोबाड भितींवर उपलब्ध आहेत....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED