झोळीछाप शबनम मध्ये मी माझे चित्रकलेचे साहित्य, पाण्याची बाटली, स्केचिंग पॅड कोंबले. फोल्डिंग ट्रायपॉड आणि ड्रॉईंग बोर्ड, बगलेत मारून मी समुद्र किनाऱ्याकडे निघालो. हे माझे नेहमीचेच रुटीन आहे. दोन बोळ्या ओलांडल्या कि, आमच्या गावचा बाजार तळ लागतो. तेथून डावीकडे वळले कि, एक पायवाट थेट समुद्र किनाऱ्यावर जाते. उजवीकडची वाट मात्र, गावाला लागून असलेल्या खडकाळ डोंगर माथ्यावर जाते. डोंगर कसला? तो एक भला थोरलय कातलांचा समूहाचं आहे! त्याला अगणित कपारी आहेत. मी बाजार तळावर पोहंचलो. कालपर्यंत 'निघाला येडा घुम्या रेघोट्या मारायला!' अश्या दृष्टीने पहाणारे, आज, मात्र मलाआश्चर्याने, कौतुकाने, आणि काहीश्या आदराने न्याहाळत होते. तुम्ही म्हणाल असा काय चमत्कार झाला कि, एक दिवसात लोकांची 'नजर' बदलली? खरच काल या गावच्या