' निंद न मुझको आये ---' हेमंतकुमारचे जडशीळ आवाजातले, वामनरावांच्या आवडीचे गाणे, कारच्या स्पीकर मधून झिरपत होते. त्यांनी स्टेयरींग वरील हाताचे मनगट किंचित कलते करूनघड्याळावर नजर टाकली. रात्री एकचा सुमार असल्याचे घड्याळ दाखवत होते. आजच गेटटुगेदर नेहमी पेक्षा ज्यास्तच भन्नाट झाले होते. ते मस्त 'लाईट ' मूड होते. त्यात उघड्या खिडकीतून येणाऱ्या गार वाऱ्याच्या झुळका, समोर स्ट्रीट लाईट आणि साइन बोर्ड्सच्या सप्तरंगात उजळलेला रास्ता. रास्ता कसला? त्याच्या साठी पायघड्याच घातल्या होत्या! फक्त त्यांच्या साठीच! निर्मनुष्य मोकळा मार्ग! पोटात गेलेली ती J&B स्कॉच व्हिस्की आता, ती त्यांच्या मेंदूला गुदगुल्या करत होती! वयाच्या साठीकडे झुकलेले वामनराव तसे मोठे शिस्तीचे भोक्ते. नियमित वागणे, मृदू बोलणे. मुलगी, स्वाती