अंशाबाई आज्जी!

  • 9.6k
  • 3.6k

लातूरला बस स्टॅन्ड मागे पोचम्मा गल्ली आहे. अनुसूयाबाई तेथे राहायची. अख्खी पोचम्मा गल्ली तिला 'अंशाबाई आज्जी ' म्हणायची. वय साधारण पासष्टी -सत्तरीच्या मध्ये कोठेतरी. 'आज्जी ' कसली ती पोचम्मा गल्लीची 'बाप ' होती ! चांगली उंच, धिप्पाड, मजबूत देहयष्टी! अण्णा, आमचे वडील, अदमासे साडेपाच फूट पेक्षा थोडे उंच, पण आज्जी त्यांच्या पेक्षा चार बोटभर उंचच! ती, त्यांच्या दूरच्या नात्यातली, आजी. त्याकाळी माणसं जवळची होती, भलेही नाती दूरची का असेनात! नवरा गेल्यावर भावकीतल्या लोकांनी हिला कंगाल करून टाकलं. जमीन जुमला हिसकावून घेतला. कोर्ट कचेऱ्या केल्या पण काही उपयोग झाला नाही. नाईलाजाने आमच्याकडे आली. गल्लीत कोणी मेल कि," मड कुठाय?" असा पुकार करत