तात्या सोमण!

  • 6.2k
  • 2.4k

माझ्या खांद्यावर बसून एक कावळा टोच्या मारतोय असे मला वाटले म्हणून मी मागे वळून पहिले. तो मागे तात्या सोमण! पाठमोऱ्या माणसाला हाक मारण्या ऐवजी, तात्या त्याचा खांद्यावरआपल्या मधल्या बोटाने टकटक करतो, हि त्याची सवय, पुढे अंगवळणी पडली. मी प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्या कडे पहिले. " या इथे एक बोकूड दाढीचा रिक्षेवाला उभा असतो. आज तुम्ही त्याला पाहिलंत का?""नाय! काही काम होत का त्याचा कडे?""नसत्या चौकश्या कशाला करताय? पाहिलंत का नाही, येव्हडच सांगा!"हे पाणी काही आपल्या नगरच नाही याची मी मनात नोंद घेतली. तेवढ्यात नरसू रिक्षेवाला आलाच. "बर झालं. तुमचीच चौकशी करत होतो. पण हा बाबा काय सांगत नव्हता!" माझ्या कडे हात करून तो