गोष्ट एका 'पोस्ट'ची!

  • 3.7k
  • 1.3k

साली एक साधी पोस्ट सुचू नये? गणूला आजवर असा कधी प्रश्न पडला नव्हता. आता तुम्हाला 'हा कोण बुवा, गणू ?' असा प्रश्न पडला असेल. जर तुमचे फेसबुक असेल तर प्रश्नच नाही. तुम्ही त्याला ओळखत असणारच! कारण त्याचा फे बु मित्रांची संख्या पावसाळ्यात तुंबलेल्या गटारा प्रमाणे ओसंडून वाहत आहे! म्हणून 'गणूच्या गप्पा ' नावाचे पेज सुरु केले. तेही लोकल लोकनेत्याच्या ढेरी प्रमाणे दिवसेंदिवस फुगतच आहे. शिवाय तो दहा बारा ग्रुपचा तो ऍडमिन आहे! यात तुम्ही कोठे तरी असणारच कि! आता तुमचे फेबु च नसेल (अरेरे ... काय दुर्दैवी जीव!) तर त्याची ओळख करून देणे गरजेचं आहे. त्याचे नाव गणू आहे. आणि