'स्वयपाकीण कोठे मिळेल?'---वेताळ कथा

  • 4.6k
  • 1.3k

नाना झिपऱ्या हेकटच. त्याने पुन्हा खांद्यावर प्रेत घेतले. आणि तो स्मशानाची वाट चालू लागला. चार सहा पावले नसतील टाकून तोच नानाच्या नाकाला उंची डिओचा वास आला. लोगोलाग वेताळाने प्रेतात प्रवेश करून समभाषण चालू केले. "बँकेच्या कर्जांवरी व्याजा प्रमाणे, तुझा हेकटपणा वया बरोबर चक्रवाढ दराने वाढत चाललाय. तू स्वतः बरोबर मला पण त्रास देतोयस. माझे काय जातंय म्हणा? मला मस्त फ्री राईड मिळतीयय. शिवाय फक्त ऐकून घेणार हक्कच 'माणूस' पण मिळतंय! असो. मघाशी मी येताना तु नाक मुरडल्याच माझ्या लक्षात आलंय! तो काल लावलेल्या डिओचा वास आहे. डिओ का लावला? तू या प्रश्नात गुंतला असशील! तर मग ऐक 'कल कि बात'.