भीमा काकी आणि डोहाळे!--मंचकमहात्म्य

  • 6.7k
  • 1.6k

जगाच्या पाठीवर मंचकरावांसाठी सर्वात कठीण काम म्हणजे 'विचार करणे ' हेच होते, आणि वारंवार ते त्यांना करावे लागत असे. आत्ता हि ते आपल्या झुपकेदार मिशीचे डावे टोक चिमटीत धरून विचारमग्न झाले होते. चिंतेचे कारण होते कि 'भीमा काकीस अर्जेंट कसे बोलावून घावे?' असे काय कारण होते कि, भीमा काकीस पाचारण करण्याची वेळ अली होती? त्याचे काय झाले कि, सकाळी सकाळी गिरिजाबाईना फोडणीच्या वासाने ( म्हणजे त्यांनी तसेच सांगितले होते ) दोन उलट्या झाल्या होत्या! थोडा वेळ विश्राम करून त्या परत घरकामात गुंतल्या होत्या. पण शेजारधर्माच्या आद्य नियमाप्रमाणे बारीक लक्ष ठेवून असलेल्या, रा. रा. भुजंगरावांनी आपल्या चातुर्यचंपक कलिका पत्नीस, खबर काढण्याच्या