पेटोंगलीचा ढव्ह

  • 5.8k
  • 1.9k

" बाय तुज नाव काय ? " विष्णू सरपंचाने घसा खाकरत प्रश्न केला." मंजुळा " साडीच्या पदराचे एक टोक बोटाला गुंडाळत , पायाच्या बोटाने जमीन उकरत, मंजु तोंडातल्या तोंडात पुटपुटली." जवान-खान बनवता येत काय ? " लगोलग थोरल्या बाईसाहेबांचा प्रश्न आला." अहो ! अहह्ह्ह ! " सरपसर पुन्हा खाकरले." म्हंजी मला आस मनायच हुत की , भाकर तुकडा बनवती ना ? नाहीतर मी शिकवीनच हो . आपलं आसचं इचारती. " आपले अहो रागवलेले पाहून थोरल्या बाईसाहेबांनी थोडी विषय सारवासारव केली. " सागुती मी शिकवेन हो ! अगदी तात्यांना आवडते तशी , चटकदार आणि स्वादिष्ठ . " मुरडत, लटक्या स्वरात धाकटी