प्रतिबिंब - 2

  • 6.5k
  • 3k

प्रतिबिंब भाग २ परत येऊन दोघे जेवले पण जाईचे मुळीच जेवणात लक्ष नव्हते. तिला राहूनराहून ती बाई गेली कुठे हाच विचार त्रास देत होता. दुपारी पलंगावर पडली, तरी तिची ती एकटक नजर जाईच्या डोळ्यांसमोरून जाईना. शेवटी जाई उठली आणि परत त्याच खुर्चीत येऊन बसली. तिला आता त्या माडीवरच्या दालनांना पाहण्याची आस लागली. किल्ल्या यशकडे होत्या. शिवा आणि रखमा जिना, दरवाजा साफ करून घेत होते. साफसफाई झाली. रखमाने चहा केला. मग सगळेच वर आले. यशने चाव्या काढून शिवाच्या हातात दिल्या. प्रथम एक चावी शिवाने पूर्ण फिरवून बाहेर काढली. मग दुसरी, नंतर तिसरी. चौथी चावी पूर्ण फिरवल्यानंतर खट्कन कुलूप उघडले. शिवाने कडी