प्रतिबिंब - 4

  • 6.4k
  • 2.6k

प्रतिबिंब भाग ४ त्या दिवशी वाडा संपूर्ण सजवला होता. नव्यानेच रंगरंगोटी करण्यात आली होती. भाऊसाहेब खुशीत होते. बऱ्याच वर्षांनी वाड्याला नवी मालकीण मिळणार होती. त्यांच्या मुलाची, अप्पासाहेबाची बायको, म्हणजेच, भाऊसाहेबांची सून वयात आली होती. व्याह्यांचा तसा निरोप आला होता. आज सूनबाई कायमच्या वाड्यावर राहायला येणार होत्या. एका मोठ्या जबाबदारीतून मोकळं झाल्याची भावना त्यांच्या मनात होती. मंडळी पोचली. रितीरिवाज, परिवारातील इतर स्त्रियांनी पूर्ण केले. भाऊसाहेबांच्या पत्नीचे अकाली निधन त्यांना फार एकटे करून गेले होते. पण मुलाला सावत्रपणा नको म्हणून त्यांनी दुसऱ्या लग्नाचा विचारही मनात आणला नव्हता. रितीप्रमाणे गावातील कलावंतीण, सूनेची दृष्ट काढायला आली होती. तिच्याबरोबर तिची उफाड्याची मुलगी शेवंताही