उद्धव भयवाळ औरंगाबाद शेजारचे सावंत आमच्या शेजारचे सावंत कुठल्याशा सरकारी कार्यालयामध्ये नोकरीला आहेत. या सावंतानी फार पूर्वी एक कथा लिहून एका मासिकाला पाठवली होती. पण ती साभार परत आली. तेव्हापासून त्यांनी ठरवलेले आहे की चांगल्या दर्जेदार कथा लिहून खूप मोठा लेखक व्हायचे. सावंत दर शनिवारी जरा लवकरच घरी येतात. ऑफिसमध्ये असतांनाच ते ठरवतात की, आज घरी गेल्याबरोबर एक कथा लिहून पूर्ण करायचीच. घरी आल्याबरोबर ते बायकोशी –पार्वतीबाईशी खूप खुशीमध्ये बोलतात. मुलांच्या अभ्यासाची चौकशी करतात. गप्पांच्या ओघात गावातील चित्रपटगृहामध्ये आलेल्या नवीन सिनेमाची माहिती ते पार्वतीबाईना सांगतात. पार्वतीबाई मग लाडेलाडे सिनेमाला जाण्याचा हट्ट