तृष्णा अजूनही अतृप्त - भाग २

(36)
  • 38.3k
  • 28.2k

" अरे जावईबापू कसं काय येणं केलत... ते ही सकाळी.." घाईने सोफ्यावरील पसारा आवरत तिच्या बाबांनी त्यांच्या जावयासाठी बसायला जागा केली. तो... तिचा नवरा... अनय... सहा महिन्यांआधी तीच आणि अनयच लग्न झालं होत. नेहमी येताना अनय आणि ती एकत्रच यायचे. आज मात्र इतक्या सकाळी आणि घाईने आपल्या जावयाचं एकटच येणं त्यांना अपेक्षित नव्हतं. " बाबा.. बसा जरा बोलायचं होत.." त्याने बाबांचा हात पकडत त्यांना बळजबरी खाली बसवलं. त्याच्या चेहऱ्यावरचा तणाव पाहून बाबाही काळजीत पडले. " काय झालं.. सगळ ठीक तर आहे ना.." बाबांनी काळजीने विचारलं. मात्र त्यातही त्यांना आपल्या स्वरातील व्याकुळता लपवता आली नाही. " नाही... " अनय थोड्या शांतपणे उद्गारला." काय झालंय..