तृष्णा अजूनही अतृप्त - भाग ५

(25)
  • 25.5k
  • 13.6k

" ये... बस इथे.." गुरुजींच्या आवाजाने त्यांची तन्द्री भंग झाली. चुपचाप आवाज न करता तो गुरुजींनी बोट दाखवलेल्या मृगजीनावर जाऊन बसला. कोणी कोणाशी काहीच बोलत नव्हतं. एक प्रकारची शांतता पूर्ण वातावरणात भिनली होती. गुरुजींच्या अनुयायापैकी कोणीतरी त्याला एका मातीच्या वाडग्यात कसलस लाल रंगाचं द्रव्य आणून दिलं. ते पाहताच त्याला भुकेची आठवण झाली. कधीपासून तो भयंकर खडतर प्रवास करत इथे येऊन पोचला होता. तहान भुकेपलीकडे इथे येऊन पोचायची ओढ इतकी जबरदस्त होती की घरातून निघाल्यापासून साधं पाणीही त्याने प्यायल नव्हतं. " ओम.. ते द्रावण पिऊन टाक.." गुरुजींनी अत्यंत प्रेमळ स्वरात आज्ञा केली. त्यानेही क्षणाचा विचार न करता तो वाडगा तोंडाला लावला. खारट, तुरट,