तृष्णा अजूनही अतृप्त - भाग ७

(40)
  • 15.6k
  • 8.2k

दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच सर्वत्र काळोख पसरला होता. वातावरण नेहमीपेक्षा जास्त कोंदट व कुबट झाले होते. पोट ढवळून टाकणारा आणि श्वास घ्यायला जमणार नाही इतका घाणेरडा वास सगळीकडे पसरला होता. वाराही अगदी जागीच गोठून गेला होता. ज्या प्राण्यांत थोडाफार जीव उरला होता ते अशुभाच्या जाणिवेने आक्रोशत होते. विश्वनाथशास्त्रींनी पहाटेपासून शिवाची आराधना चालू केली होती. भल्या पहाटे तिथून दूर असलेल्या नदीवर सचैल स्नान करून शिवलिंगावर अभिषेक करून आशीर्वाद घेतला होता. नेहमीसारखाच साधारण असा पोशाख परिधान करून ते बळी देण्याच्या मंडपाकडे निघाले.परंतु आज कपड्यांच्या आत संरक्षणासाठी रुद्राक्षाच्या माळा लपवल्या होत्या. खांद्याला भलीमोठी झोळी अडकवून आणि कपाळाला भस्ममिश्रित माती फासून सर्व तयारीनिशी त्यांनी बळीच्या मंडपात