तृष्णा अजूनही अतृप्त - भाग ९

(31)
  • 14.8k
  • 1
  • 7.9k

करालचा राग अनावर होत होता. एक सामान्य शूद्र मनुष्य आपल्याच गोटात राहून आपल्या विरोधात बंड पुकारतो हे त्याला सहन झाले नाही व इतके दिवस त्याने मनाच्या तळाशी डांबून टाकलेला अहंकार उसळी मारून वर आला. त्याने रागाने छाती पिटत गळा फाडून गगनभेदी गर्जना केली. बाजूची मगाशी बळीच्या मानेवर चालवलेली तलवार उचलून त्याने सर्व शक्तिनिशी शास्त्रींच्या अंगावर फेकली. बंदिस्त असल्याने त्यांना काही हालचाल करणं जमत नव्हतं. करालने फेकलेल्या तलवारीने तडक त्यांच्या छातीचा वेध घेतला. रक्ताची एक चिळकांडी म्हातारीच्या जळणाऱ्या अंगावर उडाली. ती त्याही जळक्या अवस्थेत भीषण हसली. शास्त्री आपली शुद्ध हरपत जमिनीवर कोसळले. त्यांच्या हतबलतेवर हसत करालने आपले मंत्रोच्चार अजुन जोमाने चालू